Nashik Lemon Rate Hike : नागरिकांना उन्हासह महागाईचे चटके! आरोग्यासाठी बहुगुणकारी लिंबाचे भाव कडाडले

Lemon Rate Hike : उन्हाळ्यात आवश्यक असणाऱ्या पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळेही महागाईचे चांगलेच फटके बसत आहे.
Lemon
Lemonesakal
Updated on

Nashik Lemon Rate Hike : वाढत्या तापमानामुळे नाशिककरांना उन्हाचे चांगलेच चटके बसत आहेत. पण त्याचबरोबर उन्हाळ्यात आवश्यक असणाऱ्या पदार्थांच्या वाढत्या किमतींमुळेही महागाईचे चांगलेच फटके बसत आहे. आरोग्याला सर्वांना बहुगुणकरी असणारा लिंबू दोन महिन्यांपूर्वी शंभर रुपये किलो होता. आता सध्या दीडशे रुपये किलो लिंबूचा भाव आहे. मोठ्या प्रमाणात लिंबाचे भाव वाढल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. ( Lemon Rate Hike due to summer heat in district )

उन्हाळ्यात लिंबाचे भाव अगदी अटकेपार गेल्याने लिंबू बाजारातून घेताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे. नाशिकमध्ये पाच रुपये प्रतिलिंबू ते दहा रुपये प्रतिलिंबू विक्री होत आहे. उन्हाळ्यात लिंबू अधिक महत्त्वाचे फळ असून, लिंबू सरबताला प्रचंड मागणी असते. परंतु सध्या अचानक लिंबाचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांनाही कसे समजून सांगावे, असा प्रश्न भाजी विक्रेत्यांना पडला आहे. सध्या आरोग्याबद्दल सजग राहणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

त्यामुळे लिंबाचे महत्त्व आता सर्वांनाच उमगले आहे. क्वचित भाज्यांमध्ये पूर्वी लिंबू वापरला जायचा. पण आता अगदी रोजचे पिण्याचे पाणी पितानाही त्यामध्ये नागरिक लिंबू टाकून पितात. तसेच जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये लिंबूचा वापर केला जातो. त्यामुळेही लिंबाची मागणी वाढत आहे. मात्र निसर्गाची अनियमितता व अवकाळी पावसामुळे आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे लिंबाचे भाव कडाडले आहेत. (latest marathi news)

Lemon
Jalgaon Lemon Rates Hike : लिंबाच्या दरात वाढ; भाजीपाला स्थिर; गारपीट, ‘अवकाळी’मुळे आवक मंदावली

भाजीपाला विक्रेत्यांच्या दृष्टीने जर १०० लिंबू घेतले, तर त्यातील किमान सात-आठ लिंबू खराब निघतात. त्यामुळे फायदा न होता नुकसान होते, तरीही ग्राहकांसाठी भाज्यांबरोबर थोडे लिंबू विक्रीस आणवेच लागतात. रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये तर प्रत्येक डिशबरोबर लिंबू द्यावाच लागतो, हेही एक कारण आहे. तसेच काही हॉटेलमध्ये तर हात धुण्यासाठीही लिंबू देतात. लिंबू हा आरोग्यवर्धक असल्यामुळे आयुर्वेदिक उपचारातही याचा उपयोग होतो. अशा या बहुगुणकारी लिंबाचे भाव कडाडल्यामुळे अनेक ठिकाणी लिंबाचा वापर कमी होत आहे.

''अवकाळी झालेल्या पावसामुळे आवक कमी व मागणी जास्त आहे. लिंबू विक्रीसाठी आणले, तर त्यात सात-आठ लिंबू खराब निघतात. त्यामुळे आमचं नुकसान होते. वाढलेल्या किमतीमुळे ग्राहक लिंबाची कमी मागणी करत आहे.''- कलेश कड, भाजी विक्रेता

Lemon
Nashik Lemon Rate Hike : उन्हाचा तडाखा वाढताच लिंबाचा वाढला तोरा ! एका लिंबासाठी 10 ते 15 रुपये मोजण्याची वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.