Nashik News : सिडकोत दिशादर्शक फलकावरील अक्षरे गायब! नावे झाली पुसट; अनेक ठिकाणी फलकांची दुर्दशा

Latest Nashik News : सिडको परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या अशा दिशादर्शक फलकांवरची नावे, अक्षरे पुसली गेल्याने तर अनेक पाट्या, फलक खराब झाल्याने कोऱ्या पाट्या पाहण्याची वेळ येत आहे.
Dilapidated plaque at Matale Mala. & an unnamed direction board at Shivpuri Chowk.& an obscured arch in the Sri Swami Samarth Nagar area of ​​Ashwin Nagar.
Dilapidated plaque at Matale Mala. & an unnamed direction board at Shivpuri Chowk.& an obscured arch in the Sri Swami Samarth Nagar area of ​​Ashwin Nagar.esakal
Updated on

Nashik News : सिडको परिसरात अनेक चौकांमधील दिशा दर्शविणाऱ्या फलकांची दुरवस्था झाली असून या फलकांवरचे नावे अस्पष्ट झाले असून काही ठिकाणचे अक्षरे गायब झाल्याने नवीन नागरिकांचा संभ्रम होत आहे. (letters on CIdco direction board missing)

सिडको सारखे गजबजलेल्या परिसरात वेळेनुसार अनेक नगरांची तसेच चौकांची निर्मिती करण्यात आली. या परिसरातील अनेक भागांमध्ये प्रत्येक ठिकाणाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जात असल्याने त्या रस्त्यावरील मुख्य दर्शनी भागांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात आले.

जेणेकरून हे फलक बघून नागरिकांना त्या परिसराची सहज ओळख व्हावी. पण, सिडको परिसरातील अनेक ठिकाणी असलेल्या अशा दिशादर्शक फलकांवरची नावे, अक्षरे पुसली गेल्याने तर अनेक पाट्या, फलक खराब झाल्याने कोऱ्या पाट्या पाहण्याची वेळ येत आहे. तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांना या फलकांचा कुठलाही प्रकारचा होत नसल्याचे चित्र सध्या सिडको परिसरात पहावयास मिळत आहे.

शहरात नव्याने येणाऱ्या लोकांना आपल्या इच्छित स्थळी सहज पोहोचता यावे यासाठी नाशिक महापालिकेकडून अनेक उपनगरांमध्ये दिशादर्शन फलक लावण्यात आले आहे. मात्र, फलक लावल्यानंतर त्याकडे प्रशासनाकडून पुन्हा लक्ष दिले जात नसल्याने अनेक फलकांची अवस्था दयनीय झाली आहे. तर अनेक फलक पुसट झाले असून काही फलकांवरील अक्षरे देखील गायब झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिक नेमके जायचे कुठे या संभ्रमात अडकून पडतात.

सिडको परिसरातील अंबड-लिंक रोड, कामटवाडा परिसर, त्रिमूर्ती चौक, शुभम पार्क, उपेंद्र नगर ,शिवपुरी चौक, उत्तम नगर, पवन नगर, सावता नगर या ठिकाणी अशा अनेक दिशा दर्शविणाऱ्या फलकांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या फलकावर फक्त कोऱ्या पाट्याच दिसून येतात.

परिसरात अनेक नगरांमध्ये जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रकारच्या लोखंडी कमानी महापालिकेकडून तयार करण्यात आल्या आणि या कमानीवर त्या नगराचे नाव टाकून रंगविण्यात आले होते, परंतु अशा अनेक कमानींवरील नावे आता अस्पष्ट झाले आहेत. (latest marathi news)

Dilapidated plaque at Matale Mala. & an unnamed direction board at Shivpuri Chowk.& an obscured arch in the Sri Swami Samarth Nagar area of ​​Ashwin Nagar.
धक्कादायक! विद्यापीठ वसतिगृहातील मेसच्या जेवणात आढळल्या अळ्या; विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

तसेच परिसरात काही भागात एकाच ठिकाणी अनावश्यक दोन-दोन दिशादर्शक लावून ठेवलेले आहेत. तर काही भागांमध्ये कुठल्याही प्रकारचा फलक लावलेला नाही. त्या सिडको परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी तयार करण्यात आलेल्या अशा आवश्यक फलकांची दुरुस्ती करून त्या परिसराचे नाव त्या फलकावर लावण्यात यावे अशा प्रकारची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

फलकांवर सर्रार बॅनरबाजी

त्रिमूर्ती चौक परिसरात मुख्य रस्त्यावर महत्त्वाच्या दिशा दर्शीविणाऱ्या फलकावर अनेक वेळा राजकीय पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छांचे बॅनर तसेच विविध कार्यक्रमांचे बॅनर लावलेले असतात. त्यामुळे येथील मुख्य रस्त्यावरील दिशादर्शक फलक अनेकवेळा राजकीय बॅनरखालीच असतो.

"परिसरातील जीर्ण झालेल्या दिशादर्शक फलकांमुळे अनेकदा नवीन व्यक्तीचा गोंधळ उडतो. त्यामुळे अशा अक्षरे दिसत नसलेल्या फलकांचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नागरिकांना होत नाही. याची लवकरात लवकर दुरुस्ती केली जावी."

-चेतन गोसावी, नागरिक

"त्रिमूर्ती चौक परिसरातील महानगरपालिकेच्या कमानीवर अनेक वेळा राजकीय शुभेच्छा बॅनर लावले जातात. त्यामुळे या ठिकाणचा दिशादर्शक फलक कायम झाकलेला असतो."

- संतोष कापडणीस, नागरिक

Dilapidated plaque at Matale Mala. & an unnamed direction board at Shivpuri Chowk.& an obscured arch in the Sri Swami Samarth Nagar area of ​​Ashwin Nagar.
Nashik water Supply : शहराला हवय 6200 दशलक्ष घनफूट पाणी! महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नोंदविली अतिरिक्त मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.