Nashik News : परवानाधारकांच्या पिस्तुलांना ‘कस्टडी’; निवडणूक काळात बेकायदेशीर 45 हत्यारे जप्त

Nashik : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, पोलिस आयुक्तालय हद्दीतील परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तूल आयुक्तालयातील परवाना शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
SAKAL Exclusive
SAKAL Exclusiveesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच, पोलिस आयुक्तालय हद्दीतील परवानाधारकांना त्यांच्याकडील पिस्तूल आयुक्तालयातील परवाना शाखेकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सुमारे ५०० परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र पोलिसांकडे जमा केले आहेत. मात्र, गेल्या महिनाभरात पोलिसांनी आयुक्तालय हद्दीत कारवाई करीत आठ गावठी कट्ट्यांसह ४५ बेकायदेशीर हत्यारे जमा करीत गुन्हे दाखल केले आहेत. (nashik license holders were ordered to deposit their pistol with license branch of commissionerate )

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १६ मार्चला आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू होताच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परवाना शाखेला आदेश देत, आयुक्तालय हद्दीत शस्त्र परवाना देण्यात आलेल्यांना त्यांच्याकडील शस्त्र (पिस्तूल/रिव्हॉल्व्हर) पोलिस आयुक्तालयात जमा करण्याचे आदेश दिले. शहर आयुक्तालयाने आतापर्यंत एक हजार ४११ जणांना शस्त्रपरवाना दिला आहे.

यातील ५१२ परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्र काडतुसांसह पोलिस आयुक्तालयाच्या संबंधित विभागाकडे जमा केले आहेत. लोकसभा निवडणूक जूनमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर परवानाधारकांना त्यांचे शस्त्र परत केले जाणार आहेत. मात्र, त्या वेळी नियमानुसार वय ७० वर्षे असलेल्या परवानाधारकांचा परवाना रद्द केला जाईल.

त्याचप्रमाणे ज्यांनी स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतला होता; परंतु त्यांना त्याची आवश्यकता नसल्याचे गोपनीय शाखेच्या निदर्शनास आल्यास अशा परवानाधारकांचाही परवाना रद्द केला जाणार आहे. तर, नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतून सुमारे चार हजार परवानाधारकांचे शस्त्र जमा करण्यात आले. (latest marathi news)

SAKAL Exclusive
Nashik News : गंगावऱ्हेतून ‘गाळमुक्त धरणास’ प्रारंभ; जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते प्रारंभ

अवैध हत्यारांविरोधात कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाणेनिहाय व शहर गुन्हे शाखेच्या पथकांकडून आयुक्तालय हद्दीत कारवाई केली जात आहे. त्यानुसार गेल्या महिनाभरात ४५ हत्यारे जप्त केली आहेत. यात आठ गावठी कट्टे, २० काडतुसे आणि ३७ विविध प्रकारांतील धारदार हत्यारे जप्त करण्यात येऊन संशयितांविरोधात आर्मॲक्ट अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यांना असतो समावेश

पोलिस आयुक्तालयाकडून माजी लष्करी अधिकारी/सैनिक, शासकीय सेवेतील अधिकारी, बँकेचे सुरक्षारक्षक, खेळाडू, शेतकरी, व्यावसायिक, राजकीय व सुरक्षात्मक कारणास्तव मागणी केल्यास शस्त्र परवाना दिला जातो. मात्र, निवडणुकांच्या काळात आयुक्तांच्या आदेशानुसार ठराविक परवानाधारकांना त्यांचे शस्त्र पोलिसांकडे जमा करावे लागतात.

SAKAL Exclusive
Nashik News : दिनकर पाटील यांना 10 वर्षांनी मिळाला न्याय; चुकीचे काम करणाऱ्या वकीलाला पन्नास हजाराचा दंड

परवानाधारक शस्त्रांची आकडेवारी

- शासकीय अधिकारी : २४०

- आर्मी : २७०

- बँक : ६५

- सुरक्षारक्षक : २०

- खेळाडू : ३१

- शेती : ५३

- व्यावसायिक : ५१३

- राजकीय : ९७

- अन्य : १२२

एकूण : १४११

''परवानाधारकांची शस्त्रे जमा करण्यात आलेली आहेत. तर, अवैधरीत्या हत्यारे बाळगणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई केली जात आहे. येत्या काळात अवैध हत्यारे व धंद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली जाईल. नागरिकांनी यासंदर्भातील माहिती कळवावी, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.''- प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त, शहर गुन्हे शाखा

SAKAL Exclusive
Nashik News : नामपूर बाजार समितीचे 2 संचालक अपात्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.