Nashik News : लाडक्‍या ‘शुंक’सह लिली, आयरे निघाले इटलीला..! नाशिकच्‍या सायकलपटूंकडून जल्‍लोषात स्‍वागत

Nashik : इटली येथील असलेली ३१ वर्षीय लिली आणि २९ वर्षीय आयरे हे सायकलपटू आपल्‍या लाडका कुत्रा शुंकला सोबत घेऊन मायदेशी इटलीला निघाले.
Schunk with Lilly and Eyre on a bicycle trip to Italy.
Schunk with Lilly and Eyre on a bicycle trip to Italy.esakal
Updated on

Nashik News : इटली येथील असलेली ३१ वर्षीय लिली आणि २९ वर्षीय आयरे हे सायकलपटू आपल्‍या लाडका कुत्रा शुंकला सोबत घेऊन मायदेशी इटलीला निघाले. ते कार्बनचे प्रमाण घटविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक झाले लावावी, ट्री- हाऊस संकल्‍पना रुजविण्यासाठी भारत ते इटली सायकल प्रवास करीत आहे. नाशिकमध्ये दाखल झाल्‍यावर या सायकलपटूंचे जल्‍लोषात स्‍वागत करण्यात आले. (nashik Lily Eyre leaves for Italy with beloved dog Shanku marathi news)

या १० जानेवारीला आरोव्हीले (तमिळनाडू) येथून सायकल प्रवासाला सुरवात केली. लिलीचे जन्मस्थान जर्मनी असले तरी ती अनेक वर्षे तमिळनाडू येथे रहिवासी होती. आयरे गेल्या वर्षापासून तमिळनाडूला ट्री हाऊस प्रकल्पामध्ये कार्यरत होता. त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जगभ्रमंती करण्याचा निश्चय केला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये त्‍यांनी ‘शुंक’ला दत्तक घेतले. सुमारे अडीच हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत त्यांचे गुरुवारी (ता. २१) नाशिकमध्ये आगमन झाले.

नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन उपाध्यक्ष डॉ. मनिषा रौंदळ यांनी त्यांचे पारंपारिक पद्धतीने औक्षण करून, शाल टोपी व हार घालून स्वागत केले. तसेच त्यांची आपल्या निवासस्थानी राहण्याची व्यवस्था केली. विशेष म्हणजे त्यांची सर्व सर्वसाधारण सामग्री, बिछाना, टेंट हे सर्व सोबत आणले होते. ‘शुंक’साठी सायकलला ट्रॉली बसवली आहे.

शुक्रवारी सकाळी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या सदस्यांसोबत सोमेश्वर धबधबा येथे सायकल राईडचे आयोजन केले होते. सकाळी सातला जेहान सर्कल येथून राईडला सुरवात झाली. या वेळी माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी त्यांचा सत्कार केला. सर्वांनी परदेशी सायकलिस्टसोबत सायकल राईडचा आनंद घेतला. निसर्गाच्या सानिध्यात सोमेश्वर धबधबा येथे त्यांचे अनुभव कथन व चर्चासत्र आयोजित केले होते.  (latest marathi news)

Schunk with Lilly and Eyre on a bicycle trip to Italy.
Nashik News : विहीर, शेतरस्ता, घरकुलसाठी 10 आरपेक्षा कमी जागेची खरेदी; तुकडाबंदी नियमात शिथिलता

या वेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, सचिव संजय पवार, उपाध्यक्ष डॉ. मनिषा रौंदळ, संचालक दीपक भोसले, माधुरी गडाख, बजरंग कहाटे आदी उपस्थित होते. माजी उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक यांनी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती दिली. परदेशी सायकलिस्टसचे सायकल प्रवासामागील उद्दिष्ट जाणून घेतले. त्यांच्याकडून पर्यावरण संवर्धनासाठी अनेक बाबींची माहिती मिळाली.

नाशिकचे वातावरण भावले

नाशिकचे वातावरण, निसर्ग व नागरिक खूप भावल्‍याची भावना या सायकलपटूंनी बोलून दाखविली. शनिवारी (ता. २३) सकाळी आपलं पर्यावरण ग्रुपचे शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवराई सातपूर येथील वनराई येथे ते भेट देणार आहेत. यानंतर रविवारी (ता. २४) सकाळी गुजरातकडे रवाना होतील.

राजस्थाननंतर दिल्ली, अमृतसर, पाकिस्तान, इराण, तुर्की, बल्गेरिया, सेरबिया, युरोपनंतर इटलीला पोचणार आहे. साधारण पुढील प्रवास दहा हजार किलोमीटरचा असेल. या प्रवासादरम्यान ते अनेक शाळांना भेट देणार असून, पर्यावरण संवर्धनाविषयी सामाजिक संस्थांना, नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

Schunk with Lilly and Eyre on a bicycle trip to Italy.
Nashik News : अतिक्रमण निर्मूलन विभागाला अखेर जाग! मेनरोड, दही पूल भागात कारवाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.