Nashik Lok Sabha Election : कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी दारू दुकानमालक ‘आऊट ऑफ स्टेशन’; चालकांचा फोन स्वीच ‘ऑफ’

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी वाइन शॉप बंद करण्याचे आदेश मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देण्यात आलेले आहे.
Wine Shop Operators Switch Off Fearing State Excise Action
Wine Shop Operators Switch Off Fearing State Excise Actionesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी वाइन शॉप बंद करण्याचे आदेश मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत देण्यात आलेले आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर व नेते मंडळींकडून दारूची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी काही वाइन शॉप चालकांनी एक- दोन दिवसअगोदरच दुकाने बंद केली असून, नेत्यांच्या पाठपुराव्यामुळे फोन ‘स्वीच ऑफ’ केले आहेत. (Liquor shop owner out of station to avoid action due to election )

निवडणूक प्रचाराची धामधूम संपलेली आहे. आता उघडपणे प्रचार करण्यास बंदी आहे. मात्र छुप्या पद्धतीने तो प्रकार सुरूच आहे. मग तो सर्वच प्रकारचा असतो. प्रचार म्हटला की सगळेच आले. खाणं- पिणं व अशा काळात तर ओल्या पार्ट्यांचे तर पेव फुटते. त्यामुळे अवैध मद्य वितरण होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळ्या पातळीवर गस्त पथक करून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

तसेच कुठे काही आढळल्यास कारवाई करण्यासाठी सरसावले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार १८ मेस सायंकाळी सहापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत वाइन शॉप बंद राहतील, असे आदेश निर्देशित केलेले आहे. काही सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, नेते यांनी वाइन शॉप चालकाकडे दारूची मागणी मोठ्या प्रमाणात करीत आहे. (latest marathi news)

Wine Shop Operators Switch Off Fearing State Excise Action
Nashik Lok Sabha Election : आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा आज बसणार; प्रचारासाठी सायंकाळी सहापर्यंत मुदत

ती पूर्ण करणे वाइन शॉप धारकांना शक्य नाही. याचे कारण असे की उत्पादन शुल्क विभागाने किती मद्य विक्री करावी याचा कोटा निर्धारित केलेला आहे. तो जर अचानक अधिक विक्री होत असेल सदर वाइन शॉप चालकाचा परवाना निलंबित अथवा कायमस्वरूपी रद्द करण्याचे अधिकार राज्य उत्पादन शुल्क विभागास आहे.

त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर व नेतेमंडळींचा पाठपुरावा अशा कात्रीत सापडलेल्या काही वाइन शॉप चालकांनी फोन बंद करून आउट ऑफ स्टेशनला जाण्यासच प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सायंकाळी सहा वाजता वाइन शॉप बंद करायचे आहे. मात्र काहींनी तर १८ मेस सकाळी तर तर काहींनी एक-दोन दिवस अगोदरच वाइन शॉप बंद करून नॉट रिचेबल झाले आहे.

''मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वाइन शॉप बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. याचा अर्थ असा की ज्या भागात सहानंतरही काही कारणास्तव मतदान प्रक्रिया सुरू आहे, त्या भागातील वाइन शॉप बंद प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बंदच राहतील. आढळल्यास सदर वाइन शॉप चालक कारवाईसाठी पात्र राहील.''- शशिकांत गर्जे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

Wine Shop Operators Switch Off Fearing State Excise Action
Nashik Lok Sabha Election : मतपत्रिका 32 लाख 70 हजार मतदारांना घरपोच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com