नाशिकमध्ये आता विकेंडला लग्नाला परवानगी!

chhagan bhujbal
chhagan bhujbalesakal
Updated on

नाशिक : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत (break the chain) शासनाच्या काही निकषांच्या आधारे पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहे. त्यानुसार, या आठवड्यात पुण्यातील संसर्ग दर घटला असला, तरी नाशिकचा दर अजूनही पाच टक्क्यांच्या आत नसल्याने ‘जैसे थे’ परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मात्र यामध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजो नाशिकमध्ये आता आठवड्याच्या शेवटी शनिवार-रविवार (विकेंड)ला लग्नाला नियमांचे पालन करत परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ शनिवारी (ता. १२) आढावा बैठक घेतली. त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने काही बदल केले असून त्यासाठी नवे आदेश काढले आहेत. केवळ मंगलकार्यालय आणि लॉन्सचालकांना शनिवार- रविवार ५० लोकांच्या उपस्थितीत दुपारी ४ वाजेपर्यंत लग्नसोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे.

बैठकीतील निर्णय
- शनिवारी व रविवारी ४ वाजेपर्यंत ५० लोकांत विवाहांना परवानगी
- संसर्ग दराचा पुढील आठवड्यात आढावा घेऊन अनलॉकचा निर्णय
- वारकऱ्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वारीवर निर्बंध
- राजकारणापेक्षा वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रीमंडळाचा निर्णय
- प्रत्येक आठवड्यात विकेंड लॉकडाउन निर्णय कायम राहील
- महापालिका क्षेत्रात संर्सग दर ५.३ टक्के
- जिल्ह्यातील कोरोना संर्सग दर ७.१२ टक्के
- दुपारी चार पर्यतच ५० लोकांत विवाह होतील

नाशिकला निर्बंध ‘जैसे थे’

नाशिकचा तिसऱ्या टप्प्यात समावेश आहे. दर आठवड्याला आढावा घेऊन एकूण रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हिटी दराचा विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. दर शुक्रवारी प्रत्येक जिल्हयाचा पॉझिटिव्हिटी दर जाहीर केला जातो. नाशिकचा विचार करता ४ ते १० जूनदरम्यान नाशिक शहरात रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. मात्र, शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होत नसून त्या भागातील लोक शहरात येण्याने संसर्ग वाढू शकतो, अशी भीती प्रशासनाला कायम आहे. यामुळे शहरात निर्बंध शिथिल होणार का, याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ शनिवारी (ता. १२) आढावा बैठक घेतली. या अनलॉक आढावा बैठकीत शनिवारी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते. शहरात पॉझिटिव्हिटी दर कमी असेल, पण ग्रामीण भागात अधिक असेल, तर निर्बंध शिथिल करून चालणार नाही. तसेच एकदा अनलॉक झाल्यानंतर पुन्हा वारंवार बंद करता येणार नाही. सध्या पाच हजार रुग्ण आहेत. ही संख्या कमी नाही. एकाचे दहा, दहाचे शंभर व्हायला वेळ लागत नाही. ही प्रशासनापुढील अडचण आहे.

भुजबळ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला. जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्याधिकारी लीना बनसोड, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाने, डॉ.प्रशांत खैरे, डॉ.अनंत पवार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.आवेश पलोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, वासंती माळी आदी अधिकारी उपस्थित होते.

आठवड्याने अनलॉकचा विचार
भुजबळ म्हणाले जिल्ह्याचा संर्सग दर (पॉझिटिव्ह रेट) ५.८० आहे. तर १२.२ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण आहे. जिल्ह्याचा मृत्युदर १.५ टक्के असून ५२२ मृत्यू पोर्टलवर अपलोड करणे बाकी आहे. सगळ्या रुग्णालयांना दोन दिवसात माहिती अपडेट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिस एकून ५३२ त्यापैकी रुग्ण बरे झाले २१० एकूण मृत्यू ५४ झाले आहेत. म्युकरमायकोसिस २३,४२० इंजेक्शन मागविले आहे. त्यापैकी ५९७० अद्याप मिळाले आहे. कोरोना नियंत्रणात येत असल्यासारखी स्थिती आहे. शहरात कोरोना बाधीतांची संख्या पाच टक्केच्या आत आहे. असे असले तरी ग्रामीण भागात प्रमाण जास्त असून तेथील नागरिकांचा शहरात वावर वाढला तर पून्हा कोरोना वाढण्याचा धोका असल्याने आठवडाभराचा अंदाज घेउन त्यानंतर अनलॉकचा विचार करता येईल. मात्र तूर्तास विकेंड लॉकडाउनला विवाह सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.


-

chhagan bhujbal
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ऑटोमोबाईल कंपन्यांना फटका
chhagan bhujbal
नाट्यगृहांना प्रेक्षकांची प्रतीक्षा; लॉकडाउनमुळे नाटकांच्या तालमींवर परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.