Nashik Lok Sabha Analysis: इच्छुकांच्या खिचडीमध्ये डाळ शिजविणे अवघडच!

ajit pawar vs sharad pawar
ajit pawar vs sharad pawaresakal
Updated on

Nashik Lok Sabha Analysis : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतील शिंदे गटाची बंडाळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रविवारच्या घडामोडी, उपमुख्यमंत्रिपदी अजित पवारांसह छगन भुजबळांचाही सहभाग झाल्याने महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.

पुलोद आघाडीपासून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर लोभ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अजित पवारांचे बंड पचलेले नाही. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार अपात्रतेच्या घडामोडी घडल्यास कदाचित अजित पवारच मुख्यमंत्री झाले तर काय, या शक्यतेने सारेच सैरभैर झाले आहेत.

त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सोयीच्या भूमिका घेतल्या असल्या, तरी कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहेत. (Nashik Lok Sabha Analysis bjp shivsena ncp mns election ajit pawar sharad pawar maharashtra politics)

अजित पवारांसोबत जिल्ह्यातील वजनदार मंत्री छगन भुजबळ आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह सगळेच आमदार सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. आजमितीस शरद पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील कुणीही ज्येष्ठ दिग्गज नेता नसल्याचे चित्र आहे.

त्याचवेळी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले आणि अजित पवार यांनाच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळालीच, तर मात्र ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रेम असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजित पवार, छगन भुजबळ यांना अव्हेरून शरद पवार यांच्यासोबत काम करणे अवघड होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्या वर्षी जिल्ह्यातील अनेक दिग्गज बागायतदारांनी शरद पवारांवरील प्रेमापोटी, स्वतःचा पक्ष म्हणून स्वतःला झोकून देत राष्ट्रवादी काँग्रेसची महिन्याभरात बांधणी करीत, देशातील पहिला राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक नांदूर-मानूर वॉर्डातून निवडून आणला होता.

त्या वेळी असलेला जोश अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस उभा करताना कार्यकर्ते दाखवू शकतील का, याबाबत शंकाच आहे.

सूत्र भाजप युतीच्या हाती

भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांचा गट अशा तिहेरी इंजिनच्या लोकसभेच्या रेल्वेत कुणाला आरक्षित सीट मिळणार? हा कळीचा मुद्दा आहे. भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या विद्यमान खासदारांना भाजपसोबत ‘फर्स्ट इन-फर्स्ट आउट’ या न्यायाने उमेदवारीसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा दावा असू शकेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ajit pawar vs sharad pawar
Saroj Ahire : साहेब प्रचारात उतरले, तर ताईंची होणार पंचाईत!

दुसऱ्या क्रमाकांची मते मिळविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री छगन भुजबळ भाजप युतीत सहभागी झाल्याने तेही लोकसभेसाठी दावा करू शकतात.

यात, भाजपच्या दिनकर पाटील यांच्यासह तीन इच्छुक, गोडसे आणि भुजबळ असे पाच उमेदवार भाजप-मित्रपक्षाच्या युतीकडून दावेदारीच्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे भाजप युतीला उमेदवार निवडीपासून सत्ता ताब्यात ठेवण्यापर्यंतची सूत्रे अधिक जवळ आली आहेत.

काँग्रेसला पुढे चाल...

भाजपला दोन्ही मित्रगटाचे दावे खोडून स्वतःचा उमेदवार द्यायचा असल्यास अजित पवार आणि शिंदे गटाची दावेदारी डावलून उमेदवारी मिळविणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला कसरत करावी लागणार आहे.

या उलट शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी करणे कमी स्पर्धेचे असणार आहे. भुजबळांच्या बंडामुळे काँग्रेसकडून नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा केला गेल्यास आश्चर्य वाटायला नको.

लोकसभेसाठी विजय करंजकर, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी महापौर दशरथ पाटील, नाशिक रोड-देवळाली व्यापारी बँकेचे माजी अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, ‘मनसे’कडून डॉ. प्रदीप पवार, सुदाम कोंबडे, भाजपकडून दिनकर पाटील, अमृता पवार, सीमंतिनी कोकाटे आदी इच्छुकांत उमेदवारीसाठी नशीब अजमाविण्याची स्पर्धा आहे.

ajit pawar vs sharad pawar
Nashik Political News: भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे आव्हान!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.