Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal

Nashik Lok Sabha Constituency 2024 : एक टक्क्यांपेक्षा कमी मतदानाचे 17 जण धनी; डिपॉझिटही जप्त

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असताना काही हौसे-नवसे उमेदवारही रिंगणात उतरतात.
Published on

किरण कवडे ः सकाळ वृत्तसेवा

Nashik Lok Sabha Constituency 2024 : लोकसभा निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु असताना काही हौसे-नवसे उमेदवारही रिंगणात उतरतात. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघ मिळून तब्बल १७ उमेदवारांना एक टक्क्यांपेक्षा कमी मतदान मिळाल्याने त्यांचे ‘डिपॉझिट’ जप्त झाले होते. त्यावेळी दोन्ही मतदारसंघात जवळपास ६५ टक्के मतदान झाले होते. (Nashik Lok Sabha Constituency 17 have less than one percent voter turnout marathi news)

यंदाच्या निवडणुकीत किती ‘हौसे’ उमेदवार उतरतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. लोकसभा निवडणूक म्हटले की भल्या-भल्या उमेदवारांना घाम फुटतो. सहा विधानसभा मतदारसंघ आणि जवळपास १८ ते २० लाख मतदारांचा कौल आजमावणारी ही निवडणूक असते. कुठल्या मतदारसंघात काय ‘फॅक्टर’ काम करेल याचा अंदाज उमेदवारांना कधी-कधी येत नाही.

जिल्ह्यातील दिंडोरी या अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघात शेतीशी निगडित प्रश्‍नांवर जास्त प्रचार केला जातो. शेतकऱ्यांचे प्रश्‍न असले तरी या मतदारसंघाच्या निर्मितीपासून (२००९) येथे भाजपचाच खासदार राहिला आहे. २०१९ च्या निवडणुकीत एकूण ६४ टक्के मतदान झाले. त्यापैकी डॉ. भारती पवार यांना सर्वाधिक ५० टक्के मते मिळाली.

त्यापाठोपाठ धनराज महाले (३२.४१ टक्के), माजी आमदार जे. पी. गावित (९.६३ टक्के), बापू बर्डे (५.१७ टक्के) मते मिळवून पराभूत झाले. पण असेही काही उमेदवार आहेत ज्यांना एक टक्के मतदानही मिळालेले नाही. यात बहुजन समाज पक्षाचे अशोक जाधव यांना (०.६८ टक्के) म्हणजेच ७७२० मते मिळाली. (latest marathi news)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीत बिघाडी, महायुतीची वाढली डोकेदुखी; ‘दिंडोरी’त चव्हाण अपक्ष उमेदवारीवर ठाम

राष्ट्रीय मराठा पक्षाचे दादासाहेब पवार (०.५१ टक्के), दत्तु बर्डे (०.४९ टक्के), टी. के. बागूल (०.४ टक्के) यांना आपले ‘डिपॉझिट’ वाचवता आले नाही. त्यांना मिळालेली मते ही ‘नोटा’पेक्षाही कमी आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात तर अशा उमेदवारांची संख्या १३ इतकी आहे. २०१९ च्या निवडणुकीत ६४ टक्के मतदान झाले होते. यात शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना सर्वाधिक ५१ टक्के मते मिळाली.

त्यापाठोपाठ माजी खासदार समीर भुजबळ (२४.२१टक्के), आमदार माणिकराव कोकाटे (१२ टक्के), पवन पवार (९.८१ टक्के) मते मिळवूनही पराभव पदरी पडला. पण त्यापुढील उमेदवारांना एक टक्केही मतदान मिळवता आले नाही. यात सोनिया जावळे, देविदास सरकटे, विलास देसले, प्रियंका शिरोळे, धनंजय भावसार, सुधीर देशमुख, सिंधूबाई केदार, शरद आहेर, विनोद शिरसाठ, प्रकाश कनोजे, संजय घोडके, शिवनाथ कासार, शरद धनराव यांचा समावेश आहे. यातील बहुतांश उमेदवार हे अपक्ष लढले आहेत.

लढाई फक्त प्रतिष्ठेसाठी

निवडणूक म्हटले की प्रत्येक इच्छुकाला उमेदवारी करावीशी वाटते. पण त्यासाठी हवे असणारे ‘इलेक्टिव्ह मेरीट’चा विचार न करता उमेदवारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपणही निवडणूक लढवली या खोट्या प्रतिष्ठेसाठी काही उमेदवार रिंगणात उतरतात. प्रत्यक्षात त्यांचे डिपॉझिटही जप्त होत असल्याचे गेल्या काही निवडणुकांचा निकाल बघितल्यानंतर लक्षात येते.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या उमेदवारीचा चेंडू मुख्यमंत्री शिंदेंच्या कोर्टात; गोडसे, बोरस्तेंवर पुन्हा खलबते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.