Nashik Lok Sabha Constituency : उमेदवार ठरले, प्रचार फिकाफिका

Lok Sabha Constituency : कांदा पिकाचा बालेकिल्ला म्हणजे दिंडोरी मतदारसंघात येणारे प्रमुख तालुके.
Bharti Pawar and Bhaskar Bhagre
Bharti Pawar and Bhaskar Bhagreesakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : कांदा पिकाचा बालेकिल्ला म्हणजे दिंडोरी मतदारसंघात येणारे प्रमुख तालुके. त्यातच गेल्या वर्षापासून कांद्याच्या भावाचा वांदा झाल्याने शेतकऱ्यांची नाराजी उघड प्रकट होत असल्याने प्रचाराच्या माहोलात पुढे काय हा प्रश्न निर्माण होत आहे. अर्थात मतदारसंघातील दोन्ही प्रमुख उमेदवार ठरले असले तरी अजूनही प्रचार फिकाफिकाच दिसत आहे. (nashik Lok Sabha Constituency constituency have been elected campaign is less )

उमेदवार काही समर्थकांच्या सोबत फिरत असले तरी सहाही तालुक्यातील प्रमुख नेते पदाधिकारी व आमदार अद्यापही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून फिल्डवर अपेक्षितपणे सक्रिय नसल्याची स्थिती आहे. आदिवासी दुर्गम भागाने वेढलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तिन्ही निवडणुकात पाण्याच्या मुद्यावर निवडणुकीचे रण तापले होते.

यावेळी पाण्याला कांदा भावाची आणि निर्यातबंदीची जोड मिळत आहे. त्यामुळे विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यापैकी मतदार कोणाला पराभवाची झळ बसवितात याकडे लक्ष लागले आहे. दिंडोरी मतदारसंघाची भौगोलिक रचनाच राजकीय समीकरणे ठरवते.

पेठ, सुरगाणा, दिंडोरी या आदिवासी तालुक्यात पर्जन्यराजाची कृपा असते. त्याचवेळी शेजारील चांदवड, नांदगाव, येवला, देवळा या भागात मात्र दुष्काळी परिस्थिती असते. त्यामुळे दुष्काळी तालुक्यात अरबी समुद्राच्या रूपाने गुजरातकडे जाणारे पाणी अडवणे हा अजेंडा प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत जाहीर केला. प्रत्यक्षात ठोस अंमलबजावणी झालेली नाही. (latest marathi news)

Bharti Pawar and Bhaskar Bhagre
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीत गुढीपाडवा ठरला महाविकास आघाडीला लाभदायी

दमणगंगा व नार-पारमधील पाण्यासह मांजरपाड्याच्या पाण्यावर हक्क सांगताना हक्काचे हे पाणी अद्याप मिळाले नसल्याची स्थिती आहे. त्यातच राज्याचे मंत्री छगन भुजबळ वगळता कोणीही या पाण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याचेही वास्तव असून याचाही रोष मतदार आत्ताच व्यक्त करीत आहेत.

दिंडोरी मतदारसंघातील कळवण,येवला, निफाड,दिंडोरी हे मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तर चांदवड भाजपाकडे व नांदगाव शिंदे शिवसेनेकडे आहे.चांदवडमध्ये भाजपचे डॉ.राहुल आहेर,कळवणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नितीन पवार,निफाडमध्ये दिलीप बनकर,येवल्यात छगन भुजबळ आणि दिंडोरीत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ तर नांदगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे आमदार आहेत.

लोकसभा मतदारसंघावर उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसत असले तरी यामागे ज्येष्ठ नेते शरद पवार नावाची ताकदही आहे किंबहुना दिंडोरीतील श्रीराम शेटे आणि येवला,नांदगाव मध्ये शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे हे नाकारता येणार नाही. त्यातच या मागील लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीची ताकद असताना तिन्ही निवडणूका भाजपाने मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत, हेही विसरता येणार नाही.

कागदावर ताकद वेगळी आणि निकाल मात्र वेगळा अशी स्थिती असल्याने विद्यमान आमदारांना देखील लोकसभेच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात आपली ताकद दाखवावी लागणार आहे. विधानसभेची ही रंगीत तालीमच असल्याने आपल्या मतदारसंघातून किती मताधिक्य मिळाले या उत्तरातून आमदारांचे वर्चस्व दिसणार आहे.

Bharti Pawar and Bhaskar Bhagre
Nashik Lok Sabha Constituency : धुळ्याच्या उमेदवारीने जिल्हा काँग्रेसतंर्गत गटबाजी उफाळली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()