Nashik Lok Sabha Constituency : भुजबळ मुंबईत, करंजकर शिर्डीत, गोडसे तुळजापूरला; महायुतीतील ट्विस्ट कायम

Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून ४२ दिवस उलटले असताना महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 esakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून ४२ दिवस उलटले असताना महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नाही. परिणामी, महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्तेही थंडावले आहेत; परंतु कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी जाहीर करावीच लागेल. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना नाशिकच्या मैदानात रंगणार असल्याने सध्या तरी एकतर्फी प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. (Bhujbal in Mumbai Karanjkar in Shirdi Godse in Tuljapur )

महायुतीमध्ये जागानिश्‍चिती व उमेदवारीसाठी आज दिवसभर रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून आले. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना झाले. खासदार हेमंत गोडसे यांनी देवदर्शनासाठी तुळजापूर, तर कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी शिर्डीत ठाण मांडले. शिंदे गटाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी विजय करंजकर यांनीही शिर्डीत तळ ठोकल्याची चर्चा आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित न झाल्याने घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता अद्यापही कायम आहे. ३ मेस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यासंदर्भात घाई केली जात नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचल्याने अस्वस्थता वाढीला लागली आहे. शनिवारी (ता. २७) महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा होती; परंतु भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मात्र समता परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन त्यात भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारी करावी, अन्यथा पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याच्या मागे सर्वांनी उभे राहावे, असा ठराव करताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाशिकची जागा लढविली जाणार असल्याची घोषणाही करण्यात आली.(Nashik Political News)

Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Constituency 2024 : आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी

भाजपचाही नाशिकच्या जागेवर दावा कायम आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाकडूनही नाशिकच्या जागेवर दावा ठोकण्यात आला. या सर्व परिस्थितीत आता अंतिम निर्णय घेण्याची वेळ आली असून, त्या अनुषंगाने शनिवारी अंतिम निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.

‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे तातडीने मुंबईला रवाना झाले; तर शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संजय शिरसाट यांनी नाशिकची जागा नाशिकलाच मिळणार असल्याचे जाहीर केल्यावर खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा दावा करीत देवदर्शन सुरू केले. देवदर्शनासाठी त्यांनी तुळजापूर गाठल्याचे समजते. त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

शेफाली भुजबळांसह कोकाटेंचे नाव चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांकडून शेफाली भुजबळ यांचे नाव चर्चेला येत आहे. दुसरीकडे छगन भुजबळ निवडणूक लढणार नसतील तर त्यांच्याऐवजी निवडणूक लढण्याची तयारी सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दर्शविली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’कडून शेफाली भुजबळ व माणिकराव कोकाटे यांची नावे आज दिवसभर चर्चेत आली.

Lok Sabha Election 2024
Nashik-Dindori Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार 29 ला अर्ज दाखल करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.