Dhule Lok Sabha Constituency : धुळे लोकसभा मतदारसंघाचा सर्जन कोण?

Lok Sabha Constituency : लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान पार पडले, उद्या मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात दुरंगी लढत झाली.
Dr. Subhash Bhamre and Dr. Shobha Bachhav
Dr. Subhash Bhamre and Dr. Shobha Bachhav esakal
Updated on

Nashik News : धुळे लोकसभा हा एकेकाळचा कॉंग्रेसचा बालेकिल्ला गेल्या तीन निवडणुकीपासून भाजपच्या ताब्यात आहे. या लोकसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात मतदान पार पडले, उद्या (ता. ४) मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे व कॉंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात दुरंगी लढत झाली. निकालाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतदारसंघाचा सर्जन कोण याचा फैसला मंगळवारी होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

या मतदारसंघात विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे तिसऱ्यांदा नशिब आजमावत आहेत. प्रारंभी एकतर्फी वाटणारी लढत महाविकास आघाडीच्या कॉग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या एकतर्फी मतदानामुळे चुरशीची झाली आहे.

विजयी उमेदवार कोणीही असो तो अत्यल्प फरकाने विजयी होईल अशी आकडेमोड गेले काही दिवस सुरु होती. यामुळे धुळेचा गड राखून डॉ. भामरे हॅट्‌ट्रीक साधणार की डॉ. बच्छाव जायंट किलर ठरणार यावर उद्या दुपारपर्यंत शिक्कामोर्तब होईल. या मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे शहर.

धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्रातील ही राजकीयदृष्ट्या महत्वाची लढत आहे. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. (latest marathi news)

Dr. Subhash Bhamre and Dr. Shobha Bachhav
Nashik Lok Sabha Election Result : नाशिकच्या खासदाराची माळ कोणाच्या गळ्यात?

"मतदारांना यंदा बदल हवा आहे. पोकळ घोषणांनी पोट भरत नाही. पंतप्रधान मोदींच्या जुमल्याला जनता उत्तर देईल. चांगल्या मताधिक्याने डॉ. शोभा बच्छाव विजयी होतील." - शरद आहेर प्रदेश पदाधिकारी कॉंग्रेस

"विजय आमचाच होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असलेला मतदारांचा विश्वास व खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केलेली विकासकामे यावेळी सार्थ ठरणार आहेत." - निलेश कचवे भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष

Dr. Subhash Bhamre and Dr. Shobha Bachhav
Nashik Lok Sabha Election : निवडणुकीचा ‘लाइव्ह’ निकाल बघा आज सिनेमागृहात!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.