Nashik Lok Sabha Constituency : ‘इव्हीएम’च्या सुरक्षेला ‘सीआरपीएफ’चा खडा पहारा; सशस्त्र बंदोबस्त

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सोमवारी (ता. २०) नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांमध्ये पार पडली.
police security
police securityesakal
Updated on

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया शांततेच्या वातावरणात पार पडली. मतदारांचे मत असलेले ‘इव्हीएम’ मशिन अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वेअर हाउसमधील स्ट्राँग रूममध्ये मंगळवारी (ता. २१) पहाटे पोहोचल्या असून, या गुदामाभोवती तीन स्तरांवर (कडे) सुरक्षेचे कडे उभारण्यात आले आहे. (CRPF to guard security of EVMs)

केंद्रीय सुरक्षा बलाच्या (सीआरपीएफ) सशस्त्र तुकड्यांचा खडा पहारा राहील. लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सोमवारी (ता. २०) नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघांमध्ये पार पडली. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या ४ जूनला होणार आहे. तोपर्यंत जनता जनार्दनाचे मत बंद असलेले इव्हीएम मशिन अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वेअर हाउसमधील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येऊन ते ‘सील’ करण्यात आले आहे.

या स्ट्राँग रूमची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी येथील बंदोबस्ताच्या नियोजनाची पाहणी करून महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या वेळी परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, चुंचाळे पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रियाज शेख, सहाय्यक निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक विजय लोंढे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सुरक्षेचे तीन कडे

स्ट्राँग रूमभोवती सुरक्षेसाठी तीन स्तर (कडे) उभारण्यात आले. नाशिक व दिंडोरी मतदारसंघांच्या इव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूमभोवतीच्या प्रथम स्तराची सुरक्षितता ‘सीआरपीएफ’च्या जवानांकडे असून, यासाठी दोन तुकड्या तैनात आहेत. दुसऱ्या स्तराची सुरक्षितता ‘एसआरपीएफ’कडे आहे. (latest marathi news)

police security
Nashik Lok Sabha Election : कोठे मतदान यंत्रामध्ये बिघाड, तर कोठे मतदारयादीत घोळ

‘सीआरपीएफ’ व ‘एसआरपीएफ’च्या तुकड्यांचा सशस्त्र बंदोबस्त असेल. तिसऱ्या व बाहेरील स्तराच्या सुरक्षेसाठी स्थानिक शहर पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. पोलिसांचे सुरक्षा कडे ओलांडण्याची कोणालाही परवानगी नाही. अंबड पोलिसांकडून दिवस-रात्र बाहेरून गस्त राहील. तसेच, पोलिसांच्या पथकाकडे बाहेरील सुरक्षेची जबाबदारी आहे.

असा आहे बंदोबस्त

- ‘सीआरपीएफ’च्या दोन सशस्त्र तुकड्या : ७२ (प्रथम स्तर)

- ‘एसआरपीएफ’च्या दोन सशस्त्र तुकड्या : ७२ (द्वितीय स्तर)

- शहर पोलिसांचे पथक : दोन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक निरीक्षक, २० अंमलदार (तृतीय स्तर)

- अंबड पोलिसांच्या पथकाकडून दिवस-रात्र गस्त

- स्ट्राँग रूमभोवती सुरक्षेसाठी ‘वॉच टॉवर’

police security
Nashik Lok Sabha Constituency : काँग्रेसने उभे केलेले आव्हान; यंदा महायुतीचे गणित चुकविणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.