Dindori Lok Sabha Constituency : मतदानात दिंडोरी राज्यात अव्वल; नाशिकमध्ये 61 टक्के मतदान

Lok Sabha Constituency : दिंडोरीत सर्वाधिक ६६.७५ टक्के मतदान झाले असून, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक टक्क्याने वाढ झाली.
Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील एकूण १३ जागांसाठी सोमवारी (ता. २०) झालेल्या मतदानात दिंडोरी मतदारसंघ राज्यात अव्वल ठरला आहे. दिंडोरीत सर्वाधिक ६६.७५ टक्के मतदान झाले असून, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा एक टक्क्याने वाढ झाली. नाशिक लोकसभेतही दीड टक्क्याने वाढ झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. (Dindori Lok Sabha Constituency)

नाशिक व दिंडोरीसह राज्यातील १३ जागांसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. शनिवार, रविवार या सुट्यांनंतर मतदान होत असल्याने कमी मतदान होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, अंतिम टप्प्यात प्रचाराचा वाढलेला जोर आणि ‘स्वीप’ उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाने जनजागृती केल्याने मतदारांमध्ये अखेरपर्यंत उत्साह दिसून आला. दिंडोरीत २०१९ च्या निवडणुकीत ६५.६५ टक्के मतदान झाले होते.

यंदा त्यापेक्षा एक टक्का जास्त मतदान झाले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचे ‘होम टाउन’ असलेल्या दिंडोरीत सर्वाधिक ७५.४२ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ महायुतीच्या डॉ. भारती पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या कळवणमध्ये ७०.७९ टक्के मतदान झाले. या मतदारसंघातील नांदगावमध्ये सर्वांत कमी ५८.२४ टक्के मतदान झाले आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरीत सर्वाधिक ७२.२४ टक्के मतदान झाले. सिन्नरमध्ये ६९.५० टक्के मतदान, तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वांत कमी ५५.३८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. एकंदरीत नाशिक शहरापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाचा कमालीचा उत्साह दिसून आला. नाशिक शहरातील मखमलाबाद व बी. डी. भालेकर शाळा या मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान झाले. वडाळीभोई (ता. चांदवड) येथे रात्री साडेआठपर्यंत मतदान चालले. मतदानात वाढ झाल्याने आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी मतदारसंघातील शेतकऱ्यांची नाराजी भाजपला भोवणार? कोणते मुद्दे ठरणार प्रभावी

चारनंतर नाशिकची टक्केवारी अंतिम

नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण किती टक्के मतदान झाले, याचे आकडे अंतिम करण्यासाठी चार वाजले होते. तरीही दोन विधानसभा मतदारसंघांचा अंतिम आकडा निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट होण्यासाठी पावणेपाच झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे प्रशासनाने आता जाहीर केलेल्या मतदानातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

"जिल्ह्यातील प्रशासन अधिकारी व सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मतदारांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभेतील मतदान केंद्रांवर दिवसभर मतदारांचा उत्साह दिसून आला. सामूहिक प्रयत्नांमुळे मतदान वाढले आहे." - बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी (दिंडोरी लोकसभा)

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : कांद्याच्या बाजारपेठेत केंद्रीय धोरणांची कसोटी

विधानसभा मतदारसंघनिहाय अंतिम मतदान

दिंडोरी

मतदारसंघ..........पुरुष.............महिला...........एकूण..........टक्के

नांदगाव..........१,०७,१४१.........८६,५१५...........१,९३,६५७.....५८.२४

कळवण-सुरगाणा............१,१०,८६७........९७,५५३...........२,०८,४२०.....७०.८९

चांदवड-देवळा............१,११,४५८..........८८,०३९..........१,९९,४९७.....६६.६५

येवला..............१,१५,४७२..........९०,१९६...........२,०५,६६९....६०.१३

निफाड............१,०४,१३१...........८३,२९४...........१,८७,४२५....६४.३१

दिंडोरी-पेठ............१,३०,३३०............१,१२,१८०........२,४२,५१२.....७५.४२

एकूण..............६,७९,३९९...........५,५७,७७७.........१२,३७,१८०...६६.७५

नाशिक

सिन्नर...........१,१७,२७८..........९५,७६७.........२,१३,०४५........६९.५०

नाशिक पूर्व......१,१६,७२८.........९८,४१५.........२,१५,१४९.....५५.३८

नाशिक मध्य......९९,६८५..........८७,७७७........१,८७,४९०.....५७.१५

नाशिक पश्‍चिम....१,३९,१४६......१,०८,७४९.....२,४७,८९६......५४.३५

देवळाली.............९३,८७२............७७,९५२.......१,७१,८२४......६२.०५

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर...............१,०५,८६६........९२,१०९........१,९७,९७५.......७२.२४

एकूण..................६,७२,५७५..........५,६०,७६९......१२,३३,३७९.....६०.७५

Dindori Lok Sabha Constituency
Dindori Lok Sabha Constituency : तुतारी वाजणार की कमळ फुलणार? निफाड मतदारसंघात आकडेमोडीचे दावे-प्रतिदावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com