Dindori Lok Sabha Constituency Election 2024 : शेतकऱ्याच्या प्रश्‍नाभोवती फिरणार दिंडोरीची निवडणूक!

Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्यातील पहिला मेळावा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवल्यात घेतला.
Dindori Lok Sabha Constituency Election 2024 onion issue
Dindori Lok Sabha Constituency Election 2024 onion issueesakal
Updated on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर शरद पवारांनी राज्यातील पहिला मेळावा दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवल्यात घेतला. त्यानंतर दोन वेळा शेतकऱ्यांची सभा आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींच्या न्याय यात्रेच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक कांद्याच्या दरातील चढ-उतार, नुकसान भरपाई आणि मतदारसंघातील नवीन प्रकल्पांभोवतीच फिरणार असल्याचे दिसून येते. (Nashik Dindori Lok Sabha Constituency Election 2024 marathi news)

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ च्या निवडणुकीपासून झाली. यात दिंडोरी-पेठ, निफाड, कळवण-सुरगाणा, देवळा-चांदवड, नांदगाव व येवला या सहा विधानसभा मतदारसंघांत शेती हा मुख्य व्यवसाय आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या रुपाने एचएएल हा कारखाना नाशिककरांना मिळाला.

या कारखान्याच्या निमित्ताने रोजगार निर्मितीला चालना तर मिळालीच शिवाय पुरक नवीन उद्योगही उभे राहिले. त्यानंतर या मतदारसंघात एवढा मोठा प्रकल्प आलेला नाही. लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्यामुळे विकास कामांपेक्षा उमेदवारांमध्येच तुलना होते.

त्यावर आधारित प्रचाराचे मुद्दे पुढे करुन निवडणूक रंगते. इतर मतदारसंघांप्रमाणे प्रचाराचा ज्वरही चढत नाही. पण प्रामुख्याने निफाड, दिंडोरीचे द्राक्ष उत्पादक शेतकरी, चांदवड, देवळा, मनमाड, नांदगाव, येवल्याचे कांदा उत्पादकांच्या प्रश्‍नांभोवती यंदाची निवडणूक केंद्रीत झालेली दिसते.  (latest marathi news)

Dindori Lok Sabha Constituency Election 2024 onion issue
Jalgaon Lok Sabha Election : भाजपचा बालेकिल्ला फोडण्याचे शिवसेना ठाकरे गटासमोर आव्हान

कांद्याच्या आयात-निर्यातीच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येते. यासंदर्भात वेळोवेळी शेतकरी संघटनांनी रास्ता रोको, आंदोलने केली. ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदीचा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. याव्यतिरीक्त नुकसान भरपाई, शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झालेली रक्कम भाजपच्या जमेच्या बाजू आहेत.

निफाड ड्रायपोर्टचा मार्गी लागलेला विषय, रस्त्यांची कामे आणि आरोग्य केद्रांना मिळालेली बळकटी या मुद्यांवर भाजपचा भर राहिल. भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून कुठला उमेदवार रिंगणात उतरवला जातो, याकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागून आहे. उमेदवार कोणत्याही तालुक्याचा असला तरी प्रचाराचा मुद्दा मात्र शेतकरी केंद्रीत राहील, हे मात्र निश्‍चित!

Dindori Lok Sabha Constituency Election 2024 onion issue
Nashik: वा रे वा! बेशिस्तांचे फोटो मोबाईलवर, कमरेला ‘इ-चलन’चे मशिन कशासाठी? द्वारका सर्कलवर वाहतूक शाखेच्या पोलिसांचा प्रताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.