Nashik Lok Sabha Constituency 2024 : आजी-माजी पालकमंत्र्यांची कसोटी

Political News : उमेदवार महायुतीच्या घटक पक्षांमधील कुठलाही असो आजी व माजी पालकमंत्र्यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार असून, यात त्यांची कसोटी लागणार आहे.
Bhujbal, Bhuse, Mahajan
Bhujbal, Bhuse, Mahajanesakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency 2024 : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघांमध्ये महायुतीकडून अद्याप जागा व उमेदवाराची निश्चिती झाली नाही; मात्र उमेदवार महायुतीच्या घटक पक्षांमधील कुठलाही असो आजी व माजी पालकमंत्र्यांना उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागणार असून, यात त्यांची कसोटी लागणार आहे. (Nashik Lok Sabha Constituency election 2024 Test of Former Guardian Ministers)

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघामधून महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. परंतु महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. त्यामुळे तूर्त महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा वारू एकतर्फी उधळला आहे.

२० मेस नाशिक लोकसभा मतदारसंघाचे मतदान आहे. त्यापूर्वी दोन दिवस अगोदर खुला प्रचार बंद होईल. प्रत्यक्ष प्रचाराला अवघे २८ दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत देखील महायुतीचा उमेदवार अद्यापही निश्चित झालेला नाही. नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहील की शिवसेनेच्या शिंदे घराकडे, हे अध्याप निश्चित झालेले नाही.

त्यामुळे अद्याप तीन ते चार दिवस तरी जागा निश्चिती व त्यानंतर उमेदवार निश्चित करण्यासाठी लागतील. पक्ष निश्चिती व उमेदवार निश्चिती झाल्यानंतर देखील रुसवे, फुगवे, नाराजी, नाट्य यांसारख्या पारंपरिक पद्धतीने सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे महायुतीसाठी नाशिकची जागा आता सोपी राहिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तीन आजी व माजी पालकमंत्र्यांसाठी नाशिकची निवडणूक कसोटीची ठरणार आहे. (latest marathi news)

Bhujbal, Bhuse, Mahajan
Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत उमेदवारीबाबत विसंवाद, गोंधळ! भाजप कांदाविरोधक; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

निवडणूक महत्त्वाची

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी तब्बल दहा वर्षे पालकमंत्री पद सांभाळले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सुरवातीचे दोन वर्षे पालकमंत्री पद त्यांच्याकडे होते. भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना गिरीश महाजन पाच वर्षे नाशिकचे पालकमंत्री होते.

त्यानंतर आता महायुतीचे सरकार आल्यानंतर अडीच वर्षांपासून सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्याकडे नाशिकचे पालकमंत्री पद आहे. या तीनही मातब्बर नेत्यांसाठी नाशिक लोकसभेची निवडणूक महायुतीसाठी जिंकणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Bhujbal, Bhuse, Mahajan
Loksabha Election 2024: आरोग्य कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची कामे! 25 वर्षांत प्रथमच नियुक्ती; आरोग्यसेवा विस्कळित होण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.