Nashik Lok Sabha Constituency : अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यामध्ये सकल मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार उभा करण्याचे आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने नाशिकमध्ये करण गायकर, ॲड. शिवाजी सहाणे, चंद्रकांत बनकर व नाना बच्छाव यांची नावे चर्चेत आली आहेत. त्याचबरोबर दिंडोरीच्या जागेवरदेखील समविचारी उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Nashik Lok Sabha Constituency election 2024 Maratha community news)
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषण केले. अगदी मुंबईपर्यंत आंदोलनाने धडक दिली. नवी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाची दहशत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत आश्वासन दिले.
पण त्यानंतर देखील जोपर्यंत ओबीसी मधून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची ताकद दाखविण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांसह मराठा समाजातील उमेदवारांना धडा शिकविण्याचा भाग म्हणून रविवारी राज्यस्तरीय बैठक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झाली.
नाशिक जिल्ह्यातून देखील मराठा समाजाचे नेतृत्व करणारे प्रतिनिधी उपस्थित होते. यापूर्वी शेकडो उमेदवार उभे करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी प्रयत्न होते परंतु व्यवहार नसल्याचे स्पष्टीकरण जरांगे पाटील यांनी दिले. त्याऐवजी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाचा एकच प्रबळ उमेदवार उभा करून मराठा समाजाने त्याला पाठिंबा देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना करण्यात आली. (latest marathi news)
जिल्हास्तरावर बैठका घेऊन नाव निश्चित करण्यास संमती घेण्यात आली. एकापेक्षा अधिक नावे आल्यास जरांगे पाटील हे एक नाव अंतिम करतील असे ठरले. लोकसभा निवडणुकीत कुठला उमेदवार द्यायचा यासंदर्भात लवकरच बैठक घेतली जाणार आहे.
नाशकात प्रबळ उमेदवार, दिंडोरीत पाठबळ
नाशिकमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, ॲड. शिवाजी सहाणे, मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा म्हणून उपोषण केलेले नाना बच्छाव तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांची नावे मराठा समाजाच्या वतीने समोर आली आहेत. त्याचबरोबर दिंडोरी या राखीव मतदारसंघामध्ये प्रबळ व समविचारी उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.