Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कुठे होता भाजप, तो आम्ही उभा केला आहे. गेल्या पाच वर्षात केंद्रीय राज्यमंत्र्यांना माझ्यासकट जनतेचा, कार्यकर्त्यांचा विसर पडला होता काय असे सांगून संतप्त जनतेचा रोष लक्षात आल्यावर आता माझी आठवण आली का असा हल्लाबोल माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केला. दरम्यान, आपण दिंडोरीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Nashik Lok Sabha Constituency Harishchandra Chavan criticism on Bharti Pawar marathi news)
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार भारती पवार यांना हरिश्चंद्र चव्हाण यांचा कोणताही पाठिंबा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारती पवार यांच्या प्रचार दौऱ्यात मी सहभागी होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल करीत असून पत्रकांवर माझी नावे टाकली जात असल्याने माजी खासदार चव्हाण यांनी भाजप उमेदवाराशी आपला कोणताही संबध नसल्याचे स्पष्ट केले. (latest marathi news)
भारती पवार यांच्याशिवाय सुरगाणा तालुक्यातील मंडल अध्यक्ष नेमण्याचे सुद्धा अधिकार आम्हाला नव्हते. पक्षाचे कार्यक्रम व होर्डींग्जवर आमचे फोटोदेखील चालत नव्हते. आताच इतका कळवळा कसा आला असा सवालही चव्हाण यांनी केला आहे. चव्हाणांच्या घरच्या आहेरामुळे भाजप कार्यकर्त्यात खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.