Nashik Lok Sabha Constituency : हेमंत गोडसेंनी घेतली गिरीश महाजनांची भेट; एकनाथ शिंदे यांच्याकडून आज घोषणेचे संकेत

Lok Sabha Constituency : नाशिक मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेला देण्यात आल्याचे निश्चित मानले जात असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी रात्री उशिरा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची हॉटेलमध्ये भेट घेतली.
hemant godse met girish mahajan
hemant godse met girish mahajanesakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेनेला देण्यात आल्याचे निश्चित मानले जात असून, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी रात्री उशिरा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची हॉटेलमध्ये भेट घेतली. महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक राहिले असताना अद्यापही महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने अस्वस्थता निर्माण झाली होती. ( Hemant Godse met Girish Mahajan )

ग्रामविकासमंत्री महाजन यांनी मंगळवारी (ता. ३०) नाशिकमध्ये येऊन राजकीय हालचाली गतिमान केल्या. त्याचबरोबर दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही आले. भाजपच्या या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी, तसेच महाजन यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत नाशिकच्या जागेचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान मुंबईतील जागावाटपाचा महायुतीतील तिढा सुटल्याने नाशिकच्या जागेचा मार्ग मोकळा झाला. मुंबईतील महायुतीतील जागांवरील उमेदवारांची नावे जाहीर झाल्यावर नाशिकमधील जागा महायुतीत शिवसेनेला सोडली गेल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर विद्यमान खासदार गोडसे हे माध्यमांसमोर आले. त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत शिवसेनेच्या पारड्यात पडला असल्याचे मानले जात आहे. (Nashik Political News)

hemant godse met girish mahajan
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेचा तिढा कायम; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चर्चा लांबणीवर

गोडसेंची शक्तिप्रदर्शनाची तयारी

बुधवारी (ता. १) नाशिकच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवाराची घोषणा करतील. विद्यमान खासदार गोडसे यांनाच उमेदवारी जवळपास निश्चित झाली. त्या अनुषंगाने उमेदवारी जाहीर झाल्यावर इगतपुरी येथील घाटनदेवी मंदिर येथून गोडसे यांची भव्य रॅली काढण्याचे नियोजन आहे. जवळपास ५०० ते ६०० चारचाकी वाहनांद्वारे गोडसे नाशिकमध्ये ‘एन्ट्री’ करतील. या माध्यमातून प्रचारात मागे पडल्याची भावना पुसून काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने सोडला आग्रह

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना भाजपने नाशिकच्या जागेचा आग्रह सोडल्याचे जाहीर केले. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकच्या जागेसंदर्भात ठरवतील, असे माध्यमांसमोर सांगितले.

hemant godse met girish mahajan
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे आज शक्तिप्रदर्शन; वाजे, भगरे यांचे आज अर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.