Nashik Lok Sabha Constituency : शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी संकटमोचक ‘जनशांती धाम’मध्ये

Lok Sabha Constituency : जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना असा उल्लेख केल्यावर महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला होता.
BJP leader Girish Mahajan while meeting Shantigiri Maharaj in Ashram at Ozar.
BJP leader Girish Mahajan while meeting Shantigiri Maharaj in Ashram at Ozar.esakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना असा उल्लेख केल्यावर महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून नवा ट्विस्ट निर्माण झाला होता. आता त्यात पुन्हा नव्याने भर पडली आहे. राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी ओझर येथे शांतिगिरी महाराज यांची भेट घेतल्याने नव्या चर्चेला उधाण आले. (In Janshanti Dham troublemaker for retreat of Shantigiriji Maharaj )

दरम्यान, हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाराजांनी माघार घ्यावी, अशी विनंती त्यांना केल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. नाशिक लोकसभा मतदारसंघात अद्यापपर्यंत तिढा सुटलेला नाही. २० मेस मतदान असताना प्रचारासाठी अवघे १७ दिवस शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीतही महायुतीच्या जागेचा तिढा सुटत नाही. मात्र, दररोज नवीन ट्विस्ट निर्माण होत आहे.

शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार व खासदार गोडसे यांनी विजयाची हॅट्‌ट्रिक साध्य करण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन केल्यावर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने भाजपकडूनही नाशिकच्या जागेवर दावा केला. त्या पाठोपाठ जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पाच आमदार असल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाशिकची जागा हवी, अशी मागणी केली.

नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीत रस्सीखेच सुरू झाली. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यावर नाशिकमध्ये ताकद लक्षात घेता मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही नाशिकच्या जागेची मागणी केली. नाशिकच्या जागेसंदर्भात सर्वप्रथम आग्रही असलेल्या भाजपने दोन पावले मागे जात शांत बसण्याची भूमिका घेतली. त्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जागेवर दावे-प्रतिदावे केले गेले.(Latest Marathi News)

BJP leader Girish Mahajan while meeting Shantigiri Maharaj in Ashram at Ozar.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेचा तिढा कायम; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चर्चा लांबणीवर

अचानकपणे छगन भुजबळ यांची उमेदवारी चर्चेत आली. मात्र, उमेदवारी लवकर जाहीर होत नसल्याने स्वतः भुजबळ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा केला जाऊ लागला. शिवसेनेतही एकामागोमाग एक नावे समोर येऊ लागली. सुरवातीला विद्यमान खासदार गोडसे यांचे नाव समोर आले. त्यानंतर विजय करंजकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आले.

शांतिगिरी महाराज यांनीही भाजपच्या काही नेत्यांची भेट घेतली. तसेच, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बोरस्ते यांनीही शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा छगन भुजबळ यांच्या स्नुषा शेफाली भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. एकामागोमाग अशी नावे चर्चेत येत असताना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र उमेदवारी अद्यापपर्यंत घोषित झाली नाही.

शांतिगिरी महाराज चर्चेत

जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी (ता. २९) उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यात पक्ष म्हणून शिवसेना असा उल्लेख केल्यावर शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी चर्चेत आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चांदवड येथील राहुड घाटातील अपघातातील जखमींची चौकशी करण्यासाठी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये आले.

चांदवडकडून नाशिकमध्ये येताना ओझर येथे शांतिगिरी महाराज यांची आश्रमात भेट घेतली. त्यामुळे महायुतीत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असले, तरी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी आपण त्यांची भेट घेतल्याचे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

BJP leader Girish Mahajan while meeting Shantigiri Maharaj in Ashram at Ozar.
Nashik Lok Sabha Constituency : नाशिक शिवसेनेकडेच! पालकमंत्री दादा भुसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.