Nashik Lok Sabha Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात जनमत स्थानिकाच्या बाजूने

Nashik News : सिन्नरमध्ये स्थानिक उमेदवार म्हणून जनमत वाजे यांच्या बाजूने असले, तरी त्या खालोखाल खासदार हेमंत गोडसे व शांतिगिरी महाराज हेही मतांचे दावेदार असतील, असे चित्र आहे.
Rajabhau Waje, Hemant Godse
Rajabhau Waje, Hemant Godseesakal
Updated on

सिन्नर : जात फॅक्टर हा नेहमीच सिन्नरच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिला आहे. मराठा व वंजारी या दोन समाजांमध्ये असणारी वर्चस्वासाठीची लढाई अनेकदा दिसून येते. मात्र, या खेपेला लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही समाज पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे यांच्यासाठी एकवटल्याचे दिसून येते. (Sinnar public opinion is in favour of local candidates)

त्यांच्या सोबतीला धनगर, माळी यासह इतर समाजघटकही असल्याने वाजे यांची पर्यायाने महाविकास आघाडीची ताकद सिन्नरमध्ये नक्कीच वाढलेली दिसते. स्थानिक उमेदवार म्हणून जनमत वाजे यांच्या बाजूने असले, तरी त्या खालोखाल खासदार हेमंत गोडसे व शांतिगिरी महाराज हेही मतांचे दावेदार असतील, असे चित्र आहे.

सिन्नरच्या राजकीय पटलावर लोकसभा निवडणुकीनिमित्त स्थानिक उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांच्यासाठी पक्ष, गट, तट बाजूला ठेवून सर्व समाजघटक एकवटल्याने मतांची मोठी आघाडी वाजे यांनाच मिळेल. आमदार ॲड. माणिकराव कोकाटे हे जरी महायुतीत सहभागी असले, तरी त्यांच्याबरोबर असणारा दुरावा गोडसेंना किती फायदा करून देईल, हे मतदानानंतर कळेल.

सिन्नर विधानसभा मतदारसंघात तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गट व शेजारच्या इगतपुरी तालुक्यातील टाकेद गट समाविष्ट आहे. माजी आमदार राहिलेले राजाभाऊ वाजे संपूर्ण मतदारसंघात आपला जनसंपर्क राखून आहेत. लोकसभेनिमित्त सर्व समाजघटक सोबत असल्याने ही राजाभाऊंच्या बाबतीत जमेची बाजू म्हणावी लागेल.

‘होम ग्राउंड’वर मोठा पाठिंबा असला, तरी खासदारकीची वाट सुकर बनविण्यासाठी उर्वरित मतदारसंघांमध्ये ताकद लावावी लागणार आहे. दोन पंचवार्षिक खासदार असलेले हेमंत गोडसे यांचे तगडे आव्हान वाजे यांच्यासमोर आहे. सलग दोन निवडणुकांत भुजबळ काका-पुतण्यांना पराभवाची धूळ चारणारे गोडसे हे वाजे यांच्याशी कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. (latest marathi news)

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Lok Sabha Constituency : प्रभावी प्रचारापेक्षा लढाऊ खासदार हवा; अंतिम टप्यातील प्रचारावर नवमतदारांचा कौल

सिन्नरमध्ये कोकाटे समर्थकांचा मोठा गट वाजे यांच्यासाठी प्रचार करीत असला, तरी त्यात त्यांचाही स्वार्थ आहे. उदय सांगळे निवडणूक प्रक्रियेतून काहीसे बाजूला आहेत. सांगळे यांना सिन्नरच्या आमदारकीचे स्वप्न आहे. ते बाजूला राहिल्याने वाजे यांना खासदारकी मिळाली, तर कोकाटे यांची आमदारकी शाबूत राहील, असा तर्क कोकाटे समर्थकांचा आहे.

मात्र, महाविकास आघाडीचे घटक म्हणून आमदार कोकाटे यांना गोडसे यांच्यासाठी मते टाकावी लागतील. अर्थात, जनमत बाजूला गेल्यास कोकाटे यांचाही नाइलाज असेल. मात्र, गोडसेंना अपेक्षित मते न देण्याचा फटका भविष्यात कोकाटे यांनाही बसू शकतो. एकंदरीत सिन्नरच्या राजकीय पटलावर लोकसभेची निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतल्याचे चित्र आहे.

वाजे यांच्यासाठी असंख्य कार्यकर्ते भाजी-भाकरी बांधून मतदारसंघ पिंजत आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातूनही आर्थिक मदत केली जात आहे. सिन्नरच्या परिस्थितीचा विचार केला, तर सद्यस्थितीत कोकाटे-वाजे यांच्याभोवती राजकारण फिरते. वाजे यांची सोबत करणारे उदय सांगळे लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर तटस्थ आहेत.

आलटून-पालटून या दोन्ही नेत्यांकडे तालुक्यातील सत्ताकेंद्रे आली-गेली. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांचा निसटता पराभव झाला. कोकाटे चौथ्यांदा आमदार झाले. या खेपेला मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची तयारी वाजे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, लोकसभेच्या मैदानात उतरण्याची वेळ वाजे यांच्यावर आली.

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Lok Sabha Constituency : धर्मसत्तेतील साधू-महंतांना राजसत्तेचा मोह कशापायी?

कोकाटे गटानेही अंदाज घेत सावध भूमिका घेतली आहे. तालुक्यातील उमेदवाराला मदत करायची झाल्यास भविष्यातील बेरीज-वजाबाकीच्या राजकारणालाही कोकाटे गटास सामोरे जावे लागेल. सिन्नर मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांचा मोठा भक्त परिवार आहे. उमेदवारी घोषित झाल्यापासून हा भक्त परिवारही पदरमोड करून प्रचारात गुंतला आहे.

गोडसे यांचा दहा वर्षांतील जनसंपर्क त्यांना अपेक्षित मते मिळवून देईल. सोबतीला कोकाटे यांच्याकडून युती धर्म पाळण्यासाठी मिळणारी मतेही असतील. या दोघांना मिळणारी मते राजाभाऊ वाजेंना मिळणाऱ्या मतांपेक्षा निश्चितच कमी असतील. मात्र, या मतांची टक्केवारी वाढल्यास वाजे यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते.

गेल्या निवडणुकीत राजाभाऊ वाजे यांनी कोकाटे हे स्थानिक अपक्ष उमेदवार असतानाही शिवसेनेच्या गोडसे यांना मदत केली होती. या निवडणुकीत ५६ हजार मते गोडसे यांना मिळाली होती; तर भुजबळ यांनी ३१ हजार मते सिन्नरमधून घेतली होती. आता भुजबळ यांना मानणारा वर्ग कोणाच्या पाठीशी जाईल आणि गोडसे यांना कोकाटेंनी मदत केल्यास ते किती मते घेतात, याकडेही सिन्नरकरांचे लक्ष लागले आहे.

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Lok Sabha Constituency : राजाभाऊ वाजे यांचे ‘कुटुंब उतरलंय प्रचारात’

तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न

- वीस वर्षांपासून मुसळगाव शिवारात ‘सेझ’ धूळ खात पडला आहे.

- इंडियाबुल्स कंपनीने उभारलेला पॉवर प्लांट अद्याप सुरू नाही.

- ‘सेझ’मधील जमिनींचे वाटप झालेले नसल्याने एकही उद्योग उभा राहिला नाही.

- माळेगावच्या औद्योगिक वसाहतीत स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न कायम.

- औद्योगिक वसाहतींमध्ये घडणाऱ्या अपघातांबाबत कठोर नियोजनाचा अभाव.

- शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न नेहमीच भेडसावतो.

- नदीजोड प्रकल्पासारख्या शासनस्तरावर मान्यता असलेल्या योजनांना गती मिळावी.

मतदार संख्या

पुरुष- १,६०,७८५

स्त्री- १,४५,१९६

एकूण- ३,०५९८१

यापूर्वी काय घडले?

२०१९

हेमंत गोडसे (शिवसेना)- ५६,६७६

ॲड. माणिकराव कोकाटे (अपक्ष)- ९१,११४

२०१४

हेमंत गोडसे (शिवसेना)- ९४,९१३

छगन भुजबळ (राष्ट्रवादी)- ५३,१४८

Rajabhau Waje, Hemant Godse
Nashik Lok Sabha Election : 107 वृद्ध, 10 दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.