Nashik Lok Sabha Constituency : गॅस शेगडी, सीसीटीव्ही अन्‌ पिपाणीला लागणार ‘लॉटरी’

Lok Sabha Constituency : अपक्ष उमेदवारांना अपेक्षित असलेल्या मतांपेक्षा कितीतरी पट अधिक मते मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ‘लॉटरी’ लागण्याची शक्यता आहे.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal
Updated on

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना अपेक्षित असलेल्या मतांपेक्षा कितीतरी पट अधिक मते मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांना ‘लॉटरी’ लागण्याची शक्यता आहे. अर्थात, एवढ्या मतांवर त्यांना विजयी होता येणार नसले, तरी प्रचारासाठी जास्त कष्ट न घेताही हे कसे घडले, याविषयी त्यांना आश्‍चर्याचा धक्का बसू शकतो. (Nashik Lok Sabha Constituency)

नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी सोमवारी (ता. २०) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील मतदारांनी कमालीचा उत्साह दाखविल्याने दोन्ही ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. उमेदवारांचा बालेकिल्ला असलेल्या भागात तर मतदान केंद्र ‘हाउसफुल्ल’ झाल्याचे दिसले. गर्दी कमी करण्यासाठी मतदान प्रक्रिया जलद करण्याचे प्रयत्न झाले.

या घाईगडबडीत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना फक्त दोन किंवा तीन नंबरचे बटण दाबा, अशा तोंडी सूचना केल्या. मतदार प्रत्यक्ष मतदान केंद्रात पोहोचल्यावर त्यांना समोर दोन ईव्हीएम दिसले. यापैकी कुठल्या मशिनवरचे दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचे बटण दाबायला सांगितले, हेच त्यांच्या लक्षात आले नाही.

त्यामुळे अनेक मतदारांनी दुसऱ्या ‘ईव्हीएम’वरील अपक्ष उमेदवार गणेश बोरस्ते यांच्या गॅस शेगडीसमोरील बटण दाबले. काहींनी चंद्रकांत ठाकूर यांच्या सीसीटीव्हीसमोरील बटण दाबल्याची कबुली दिली आहे. हा प्रकार फक्त नाशिक लोकसभेतच घडलेला नाही; तर दिंडोरीतही बाबू भगरे (सर) या अपक्ष उमेदवाराच्या पिपाणी या चिन्हासमोरील बटण दाबल्याचे अनेकांनी सांगितले. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : निलंबित शिक्षक, कर्मचारी निवडणूक कामकाजात

भगरे सरांना मतदान करण्यास सांगितले; पण ‘इव्हीएम’वर किती नंबरचे बटण दाबायचे, याविषयी स्पष्टपणे न सांगितल्याने त्यांनी नावानुसार बटण दाबले. त्यात अनेकांनी दहा क्रमांकाचे बटण दाबल्याची कबुलीही दिली. तुतारी वाजविणारा मनुष्य हे चिन्ह पहिल्यांदाच निवडणुकीत वापरात आल्याने त्याविषयी लोकांमध्ये फारशी जनजागृती झालेली नव्हती. ज्येष्ठ नागरिकांना हे चिन्ह पाहून मतदान करताना अडचण झाल्याचे दिसून आले.

चिन्हेही अस्पष्ट

नाशिक लोकसभा मतदारसंघात मशाल हे चिन्ह स्पष्टपणे दिसले; तर धनुष्यबाण हा जरा अस्पष्ट दिसल्याचे मतदारांनी सांगितले. तसेच, दिंडोरीत कमळाचे चिन्ह स्पष्टपणे दिसत होते; पण तुतारी वाजविणारा मनुष्य हे चिन्ह अस्पष्ट दिसत असल्याने मतदारांमध्ये घोळ झाल्याची चर्चा आता मतदारसंघात सुरू झाली आहे. त्यामुळे हजार ते दोन हजारांपर्यंतची मते या उमेदवारांना अनपेक्षितरीत्या मिळतील, असे मतदारांच्या संवादांवरून दिसून येते.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरीचा निकाल दुपारी बारापर्यंत, नाशिकला चार वाजणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.