नांदगाव : नारपारचे पाणी, दुष्काळाची तीव्रता, चाऱ्याची टंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष्य, कांद्याच्या प्रश्नावर असलेली अस्वस्थता, रेल्वे गाड्यांचे थांबे, पायाभूत सुविधा म्हणून तयार झालेला केवळ आरेखन चुकल्याने वादग्रस्त ठरलेला सब वे, मनमाड कुर्ला एक्स्प्रेस सुरु करणे, शटल सेवा पंचवटी पुढे जाणार का आदी जिव्हाळ्याचे मुद्दे यंदाच्या निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. (Nashik Lok Sabha Constituency)
हे मुद्दे निकाली निघू न शकल्याने जनतेत नाराजीची भावना आहे. ही बाब महाविकास आघाडीसाठी फायद्याची तर महायुतीसाठी तोट्याची मानली जात आहे. गेल्या निवडणुकीच्या काळातही दुष्काळ, चारा छावण्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व अन्य ज्वलंत मुद्दे असूनही डॉ. भारती पवारांना सर्वाधिक ७५ हजाराचे मताधिक्य होते.
सलग चार वेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने नांदगावने भाजपच्या बाजूने दिलेला कौल दुर्लक्षित करता येणार नसला तरी यंदा परिस्थिती वेगळी आहे. वारे वेगळे वाहताहेत. मागच्या वेळेला उमेदवारी नाकारल्याची सहानुभूती, मोदी फॅक्टरची जादू या गेल्या निवडणुकीतल्या डॉ. पवार यांच्या जमेच्या बाजू होत्या.
कारणे वेगवेगळी असली तरी स्वपक्षापेक्षा केडरबेस असलेल्या शिवसेनेची आयती रसद होती. शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघातील सगळी सत्ताकेंद्रे व जिल्हाप्रमुख असलेल्या सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आयते संघटनात्मक बळ हा डॉ. पवारांच्या दृष्टीने प्लस पॉईंट ठरला होता. काही झाले तरी यंदाही डॉ. पवार यांना मागच्यापेक्षा अधिक लीड मिळवून देण्याचा निर्धार आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त करतांना डॉ. भारती पवार यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. (latest marathi news)
असे असले तरी संवादाची घडी विस्कळीत झाली की काय घडते याचा अनुभव डॉ. पवार यांना सध्या अनुभवयास मिळत आहे. मात्र नऊशे कोटींची केलेली पाच वर्षातली विकासकामे यावर डॉ. भारती पवार सामोऱ्या जात आहेत. आमदार सुहास कांदे यांच्याशिवाय ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या ॲड. जयश्री दौंड, दत्तराज छाजेड, नितीन पांडे, विलास आहेर, राजेश कवडे, संजय सानप, राजाभाऊ बनकर, गणेश शिंदे अशी फळी काम करीत आहे.
निवडणुकीच्या घोषणा होण्यापूर्वीच तीन महिने अगोदर भास्कर भगरे यांनी गाठीभेटी वाढवित जनसंपर्क वाढविला होता. आता त्यांच्यासाठी थेट शरद पवार, जयंत पाटील मनमाडला जाहीर सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष असलेल्या महेंद्र बोरसे यांनी तालुक्यातील दुष्काळाच्या मुद्दा रडारवर आणत बेमुदत उपोषण केले होते.
हा पक्षासाठी प्लस पॉईंट ठरतो की नाही हेही निकालानंतर स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार ॲड. अनिल आहेर, ॲड. जगन्नाथ धात्रक, गणेश धात्रक, महेंद्र बोरसे, संतोष गुप्ता, संतोष बळीद, शशिकांत मोरे, सुनील पाटील, हरेश्वर सुर्वे आदी महाविकास आघाडीतील नेते भगरे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले आहेत.
गेल्या निवडणुकीत २०१९ ला वंचित फॅक्टर महत्वाचा ठरला होता. दिंडोरीमधून मिळालेल्या ५९ हजार मतांपैकी १५ हजार मते वंचितला नांदगावमधून मिळाली होती, हेही दुर्लक्षित करता येणार नाही. यंदा वंचितच्या कामगिरीकडे त्यामुळे लक्ष लागले आहे.
डॉ. पवार यांची जमेची बाजू
- नांदगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्ग, मनमाड रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचा कायापालट.
प्रतिकूल मुद्दे
रेल्वे गाड्यांना न मिळालेले थांबे, सब वे मध्ये साचणारे पाणी, कांद्याच्या प्रश्नावर होणारी कोंडी, दुष्काळानंतर झालेली आर्थिक कोंडी.
आकडेवारी
•महिला मतदार : १५८०७५
•पुरुष मतदार : १७४४३४
•एकूण मतदार : ३३२५१२
२०१४
हरिश्चंद्र चव्हाण (भाजप) १०००७२
डॉ. भारती पवार(राष्ट्रवादी) ३६८०७
एकूण मतदान १४८३६३
२०१९
डॉ भारती पवार (भाजप) ११५३३६
धनराज महाले(राष्ट्रवादी) ४०१९२
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.