Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा; एकमताने उमेदवार ठरविण्याचा ठराव

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस अधिक जटील होत चालला आहे.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदारसंघाचा तिढा दिवसेंदिवस अधिक जटील होत चालला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निवडणुक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या शहर व ग्रामीण पदाधिकायांची बैठक झाली. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची मोठी ताकद असल्याने नाशिकची जागा मिळालीच पाहिजे असा आग्रह धरताना छगन भुजबळ यांचे उमेदवारीसाठी पुन्हा मन वळवावे, त्यांनी नकार दिल्यास इच्छुकांनी एकमताने उमेदवार ठरवून निवडणूक लढवावी असा ठराव संमत करण्यात आला. (NCP claim on Nashik seat)

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सर्व पदाधिकारी आवर्जून हजर होते. माजी आमदार जयवंत जाधव म्हणाले, विरोधी पक्षाकडून उमेदवाराची घोषणा होवून एक महिना झाला, तुमचा मुहूर्त कधी असे आता मतदारच विचारायला लागले. भाजप इतकीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद नाशिक लोकसभा मतदारसंघात आहे.

इगतपुरी-त्र्यंबक तालुक्यात कॉंग्रेसचे हिरामण खोसकर आमदार असले तरी ते आपलेच असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे म्हणाले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असल्याने जागेची आग्रही मागणी केली. माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादीलाच जागा मिळाली पाहिजे. उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, माजी आमदार शिवराम झोले यांची छगन भुजबळ यांच्या मागे राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद लावण्याचे आश्‍वासन दिले. नाशिकची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसलाच मिळावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तातडीने जाऊन प्रस्ताव मांडण्याचा सल्ला पदाधिकाऱ्यांनी दिला.  (Nashik Political News)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या मनात वेगळ्या घराचा विचार : सुधाकर बडगुजर

समता परिषदेचे बाळासाहेब कर्डक म्हणाले, छगन भुजबळ यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ बैठक घेण्यासाठी आठ दिवस का लागले असा प्रश्‍न स्वतःला विचारला पाहिजे. समर्थन करताना एका विशिष्ट समाजाचा दबाव होता, मात्र दुसरा समाजही मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचा विचार केला नाही. विकासाचा मुद्दा हरवला आहे.

मी इच्छुक नाही पण...

सिन्नरचे आमदार ॲड. माणिक कोकाटे यांनी छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध नसल्याचे स्पष्ट करताना मी निवडणुकीत इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. माझे नाव मिडियातून पुढे आणले गेले. मात्र पक्षाकडून आदेश दिला तर मी निवडणूक लढवण्यासाठी तयार असेल असे स्पष्ट केले. छगन भुजबळ यांची उमेदवारी सोशल इंजिनिअरिंगचा भाग आहे. त्यामुळे सिन्नर मतदारसंघात त्यांच्यासाठी निवडणूक लढवण्याचा संदेश दिला. माजी खासदार समीर भुजबळ माझ्यासाठी रात्री-अपरात्री फिरल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

भुजबळांची मनधरणी

छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवावी यासाठी सर्वांनी एकत्रितरीत्या त्यांची मनधरणी करावी. अन्यथा त्यांच्या सहमतीने अन्य इच्छुकांपैकी एक उमेदवार निश्चित करून ही जागा राष्ट्रवादीने लढवावी. यावर एकमत झाले.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik-Dindori Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीचे उमेदवार 29 ला अर्ज दाखल करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.