Nashik Lok Sabha Constituency : ईद - ए- मिलादचे निमित्त शिवसेना - नाशिक भाजपा एकत्र

Lok Sabha Constituency : नाशिक भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ईद-ए-मिलादचे निमित्त साधत संयुक्त भेटीने तसे संकेत मिळत आहेत.
Shiv Sena Nashik BJP together
Shiv Sena Nashik BJP togetheresakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदार संघात अद्याप जागा निश्चिती झालेली नाही. मात्र लवकरच हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून नाशिक भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून ईद-ए-मिलादचे निमित्त साधत संयुक्त भेटीने तसे संकेत मिळत आहेत. शिंदे गटाकडे नाशिकची जागा राहिल्यास भाजपा आणि संघ परिवार अजय बोरस्ते यांच्या नावासाठी अनुकूल असल्याच्या वृत्तावर या छायाचित्रामुळे जणू शिक्कामोर्तब झाले आहे. (Nashik occasion of Eid e Milad Shiv Sena Nashik BJP together )

लोकसभेच्या राज्यातील बहुतांश जागांचा तिढा सुटला आहे. मात्र नाशिकच्या जागेसंदर्भात अद्यापही जैसे-थे परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्वेक्षणामध्ये नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यातून भाजपाने नाशिकच्या जागेवर दावा केला. दुसरीकडे दहा वर्षांपासून शिवसेनेचे खासदार असल्याने नाशिक शिवसेनेकडेच राहिल, असे सांगत श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या होत्या.

तेव्हापासून नाशिकचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप ज्येष्ठ नेते अमित शहा यांची दिल्लीत बैठक झाल्यानंतर मनसेच्या आशा पल्लवीत झाल्या. महायुतीच्या चार पक्षांमध्ये जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच अचानक छगन भुजबळ यांचे नाव नाशिकसाठी पुढे आले.

त्यानंतर सर्वच प्रक्रिया अधिक घुसळून निघाली. अद्यापपर्यंत नाशिकच्या जागेचा निर्णय झालेला नाही. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकच्या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र, विद्यमान खासदार गोडसे यांच्याबाबत भाजपा, संघ परिवार अनुकूल नाही. दरम्यान, संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांची चाचपणी करुन सकारात्मक अभिप्राय दिला. (latest marathi news)

Shiv Sena Nashik BJP together
Nashik Lok Sabha Constituency : शहर-जिल्हा काँग्रेस झाली विना प्रभारी; राजू वाघमारे यांनी सोडली काँग्रेस

त्यानंतर लगेचच ईदच्या निमित्ताने नाशिक भाजपाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते एकत्र दिसून आले. 'ये फोटो कुछ कहता है' असे कॅप्शन देत समाजमाध्यमांमध्ये तो व्हायरलही झाला. त्यामुळे महायुतीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांतर्फे नाशिकच्या जागे संदर्भात मौन असले तरी लोकसभेची जागा कोणाला जाईल, याचे मात्र संकेत मिळत आहेत.

'हम साथ साथ है'

नाशिकच्या जागे संदर्भात दावे प्रतिदावे केले जात असले, तरी अद्याप जागा निश्चिती नाही. मात्र महायुतीमध्ये सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपची भूमिका महत्त्वाची आहे. ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे एकत्रितपणे मुस्लिम बांधवांची भेट घेण्यात आली. या प्रक्रियेत भाजप व शिंदे गट दोन्हीही 'हम साथ साथ है' या भूमिकेत दिसले त्यामुळे नाशिकच्या जागेचा कल शिंदे सेनेकडे असल्याचे दिसून आले.

शहर-ए-खतिब, गुलजार कोकणी, शाहिन मिर्झा यांच्यासोबत नाशिक शहर भाजपा टीममधील ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, महानगराध्यक्ष प्रशांत जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, नाना शिलेदार, गणेश कांबळे, विजय काठे, डॉ. प्रशांत भदाणे हे प्रमुख पदाधिकारी एकत्र गाठी-भेटी घेताना दिसून आले.

Shiv Sena Nashik BJP together
Nashik Lok Sabha Constituency : धुळ्याच्या उमेदवारीने जिल्हा काँग्रेसतंर्गत गटबाजी उफाळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.