Nashik Lok Sabha Constituency : दावे-प्रतिदावे, पैजा अन्‌ वादविवादात विजयाचा दावा!

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाही, असे म्हणणाऱ्यांना वाढलेल्या टक्केवारीने सणसणीत उत्तर दिले आहे.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal
Updated on

येवला : लोकसभा निवडणुकीत मतदार मतदानासाठी बाहेर पडत नाही, असे म्हणणाऱ्यांना वाढलेल्या टक्केवारीने सणसणीत उत्तर दिले आहे. मतदारसंघातील ३२० मतदान केंद्रांपैकी तब्बल ६३ ठिकाणी ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे, तर शहरातील मुस्लिमबहुल अँग्लो ऊर्दू केंद्रावर सर्वाधिक ८६ टक्के मतदान झाले आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

यावेळी मतदारांनी शेवटपर्यंत आपला कल कळू न दिल्याने अतिशय चुरशीत मतदान प्रक्रिया पार पडल्याने अंदाज लावणे कठीण झाले असले तरी सर्वांच्या चर्चेतून तुतारी जोरात वाजेल, असे सांगितले जात आहे. या वेळी अनेक मतदारांनी उमेदवार न बघता थेट पक्ष, पंतप्रधान, हिंदुत्व, पक्षप्रमुख, कांदा व शेतमालासह इतर गोष्टींना प्राधान्य दिल्याने मतदानात वाढ झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे अनेक गावांत तर मतदारांपर्यंत उमेदवार पोचलेही नव्हते, तरीही मतदार घराबाहेर निघाल्याने उमेदवारांप्रति आस्था होती की रोष, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. मात्र मतदान वाढल्याने समाधानही व्यक्त होत आहे. मतदारसंघातील ३१६ केंद्रांपैकी तब्बल ६३ केंद्रांवर मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा अधिक, तर निम्म्या केंद्रांवर ६० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे.

विशेष म्हणजे शहरासह तालुक्यातील मुस्लिमबहुल गावात सर्वाधिक मतदान झाले असून, शहरातील अँग्लो ऊर्दू शाळेच्या केंद्रावर ८६ टक्के मतदानाची नोंद आली आहे. याचवेळी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपरिक वर्ग असलेल्या भागातील स्वामी मुक्तानंद शाळेच्या केंद्रावर ७५ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले आहे. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून स्ट्रॉग रूममध्ये प्रतिनिधी

शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी सुकडीच्या सरी कोसळल्या, तर काही भागात कोणी फिरकलेच नाही, तरीही टक्केवारीत झालेली वाढ मतदारांचा रोष आणि सहानुभूतीही दर्शवीत आहे. मतदारसंघातील एक लाख ६४ हजार ५३४ पुरुष मतदारांपैकी एक लाख १५ हजार ४७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

तर एक लाख ५० हजार महिलांपैकी ९० हजार १९६ महिलांनी मतदान केले. यामुळे पुरुषांची टक्केवारी ७०.१८ तर महिलांची टक्केवारी ६०.१३ राहिली आहे. एकूण तीन लाख १४ हजार ५५१ मतदारांपैकी दोन लाख पाच हजार ६६९ मतदारांनी (६५.३८ टक्के) मतदान केले.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : प्रत्येक मशिनचा नंबर उमेदवारांच्या मोबाईलवर; लोकसभा निवडणूक मतमोजणी

सगळीकडे चर्चा मतमोजणीचीच..!

कुठेही जा आकडेमोड अन् दावे-प्रतिदावेच ऐकायला मिळत आहेत. अनेकजण मतदानानंतर फोनवरून इकडच्या तिकडच्या गावातील मित्रांशी बोलताना निकालाचे अंदाज घेत आहेत. तर नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट भेटल्यास आपल्याकडे काय स्थिती आहे, निवडून कोण येईल, याचेच संवाद व चर्चा होत आहे. एकीकडे शेतीची कामे सुरू नसल्याने निकालाच्या गप्पा, विजयाचे आणि मताधिक्याचे दावे-प्रतिदावे, व्यक्तिवाद आणि त्यातून संघर्षही होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर युक्तिवाद!

मतदान झाल्यानंतर पुन्हा सोशल मीडियात रंगत वाढली आहे. सर्वच समर्थक आपला पक्ष अन्‌ आपल्या उमेदवाराची बाजू मांडताना कसा विजयी होईल आणि कसे लीड मिळेल, हे दावे करून सांगत असल्याने चांगलीच करमणूक होत आहे.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.