Nashik Lok Sabha Constituency : उमेदवारी जाहीर होताच महायुतीमध्ये धुसफूस; समन्वय समितीच्या बैठकीकडे आमदारांनी फिरवली पाठ

Lok Sabha Constituency : विलंबाने का होईना महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये पहिल्याच दिवशी मिठाचा खडा पडला.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nashik News : विलंबाने का होईना महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये पहिल्याच दिवशी मिठाचा खडा पडला. समन्वय समितीच्या बैठकीत महायुतीच्या पाच आमदारांपेकी एकाही आमदाराने उपस्थिती न लावल्याने महायुतीतील धुसफुस समोर आली आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

जवळपास सव्वा महिन्यानंतर महायुतीचा उमेदवार जाहीर झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे सकाळच्या सत्रात दिसले मात्र दुपारनंतर महायुतीमधील धुसफुस समोर येताना दिसली.

महायुतीच्या वतीने एका हॉटेलमध्ये समन्वय समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नाशिक लोकसभा मतदारसंघांमधील महायुतीचे पाचही आमदार उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु एकही आमदार उपस्थित राहिला नाही.

त्या व्यतिरिक्त महायुतीचे ज्येष्ठ नेते म्हणून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली. आमदारांशी संपर्क केल्यानंतर आम्हाला या संदर्भात कुठलाही दूरध्वनी अथवा निरोप मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. आमदारांच्या अनुपस्थितीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये फार आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. (Latest Marathi News)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे कुटुंबीयांकडे 16 कोटींची संपत्ती; गेल्या 5 वर्षांत अचल संपत्तीत काहीशी घट

गोडसेंची भुजबळ भेट चर्चेत

महायुतीचे आणखी एक मंत्री व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. वास्तविक उमेदवार हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांची भेट घेणे अपेक्षित होते.

त्यापूर्वी भाजपचे मंत्री गिरीश महाजन व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील भुजबळ फार्म येथे जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही गोडसे यांनी भुजबळ यांची भेट न घेतल्याने नाराजीचा दुसरा अंक समोर आला.

पुन्हा पेटवा मशाली

नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. मात्र विलंब होत असल्याने भुजबळ यांनी उमेदवारीतून माघार जाहीर केली. त्यानंतर मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोन दिवस शिल्लक रहिला असताना महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : शिवसेना फुटीनंतर ठाकरेंचा दिल्लीला फोन

त्यानंतर भुजबळ समर्थकांकडून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली गेली. ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, आता पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशा स्लोगनच्या पोस्ट व्हायरल झाल्याने महायुतीमध्ये नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बरोबर २०२४ म्हणजे काय रे भाऊ?

महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर सोशल मिडियावर सध्या २०१४ अधिक २०१९ बरोबर २०२४ ही पोस्ट अधिक वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टचा अर्थ अनेकजण एकमेकांशी बोलून विचारत आहेत. परंतू जाणकारांना दोन लोकसभा निवडणुकीचा हिशोब सन २०२४ च्या निवडणुकीत होईल असा लावला जात असल्याने या मागे महायुतीमधील कुरबुरी व विशेष म्हणजे छगन भुजबळ व समीर भुजबळ या दोघांचाही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी पराभव केल्याने त्या पराभवाची सल काढण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : डॉ. भारती पवार, हेमंत गोडसेंचा अर्ज सादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.