Nashik Lok Sabha Constituency : पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या आज नाशिक जिल्ह्यात सभा

Lok Sabha Constituency : नाशिक व दिंडोरीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत.
Prime Minister Modi, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Prime Minister Modi, Sharad Pawar, Uddhav Thackeray esakal
Updated on

Nashik Nashik : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला असून, नाशिक व दिंडोरीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडीचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (ता. १५) दुपारी दोनला पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभा होणार आहे. (Nashik Lok Sabha Constituency)

त्यांच्यापाठोपाठ महाविकास आघाडीचे प्रमुख नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वणी (ता. दिंडोरी) येथील मविप्र महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी पाचला महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या सभांमध्ये कांदा व द्राक्ष उत्पादकांचा मुद्दा केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची तोफ नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी सातला धडाडणार आहे. नाशिकमध्ये येऊन उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंच्या व्यासपीठावर शरद पवारही बोलतील, अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठारून विरोधकांचा समाचार घेतील. पंतप्रधान मोदी यांच्या पिंपळगाव येथील सभेसाठी नाशिक, दिंडोरी व धुळ्यातील महायुतीचे नेते उपस्थित राहणार आहेत. (latest marathi news)

Prime Minister Modi, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Nashik NMC News : अस्वच्छता करणाऱ्या 980 नागरिकांवर कारवाई

त्यामुळे दोन्ही बाजूंच्या प्रचारतोफा एकाच दिवशी धडाडणार असल्याने आरोप-प्रत्यारोपांची राळ उडवली जाणार आहे. ग्रामीण भागातील सभेत शेतीशी निगडित मुद्यांवर भर दिला जाईल. शहरात उमेदवारांचे उणेदुणे काढण्यारून प्रचारात रंगत येणार असल्याचे दिसते. येत्या शनिवारपर्यंत महायुती व महाविकास आघाडीचे नेते नाशिकमध्ये प्रचारासाठी येणार आहेत.

कोण, कुठे, कधी बोलणार...

-पंतप्रधान नरेंद्र मोदी : शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) : वेळ- दुपारी दोन

-खासदार शरद पवार : मराठा विद्याप्रसारक समजाचे महाविद्यालय, वणी : वेळ- सायं. ५.

- माजी मुखमंत्री उद्धव ठाकरे : अनंत कान्हेरे मैदान, नाशिक : वेळ- सायं. ७.

Prime Minister Modi, Sharad Pawar, Uddhav Thackeray
Nashik News : इगतपुरीच्या रानमेव्याला ऐन हंगामात ‘बुरे दिन’! वळिवाचा परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.