Nashik Lok Sabha Constituency : धर्मसत्तेतील साधू-महंतांना राजसत्तेचा मोह कशापायी?

Lok Sabha Constituency : साधू-महंत निवडणुकीच्या ‘आखाड्या’त उतरल्याचे पाहून धर्मसत्तेतील बड्या साधू-महंतांना राजसत्तेचा मोह का व्हावा, असा सवाल नाशिकच्या पुण्यनगरीत उपस्थित होत आहे.
Shantigiri Maharaj and Siddheswarananda Saraswati
Shantigiri Maharaj and Siddheswarananda Saraswatiesakal
Updated on

संजय वाघ : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर या षडरिपूंवर मात आणि संसाराचा त्याग करीत जे अध्यात्माचा मार्ग निवडतात; त्याग, तप आणि साधनेच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी दिशादर्शकाची भूमिका बजावतात, अशा संन्यस्त साधू-महंतांविषयी समाजात आदरभावना असते. (Nashik Lok Sabha Constituency)

भक्त परिवार त्यांच्यात दैवी शक्तीची अनुभूती घेतात. एकीकडे राजकारणासारख्या क्षेत्राविषयी सर्वसामान्यांत कमालीची घृणा असताना, दुसरीकडे ज्यांच्याविषयी आदरभाव आहे, असे साधू-महंत निवडणुकीच्या ‘आखाड्या’त उतरल्याचे पाहून धर्मसत्तेतील बड्या साधू-महंतांना राजसत्तेचा मोह का व्हावा, असा सवाल नाशिकच्या पुण्यनगरीत उपस्थित होत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराज व त्र्यंबकेश्‍वरचे सिद्धेश्‍वरानंद गुरुस्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आणि चर्चांना उधाण आले. त्र्यंबकेश्‍वर येथील महाराज हे निवडणूक ‘आखाड्या’त नवखे आहेत. मात्र, शांतिगिरी महाराज तसे निवडणुकांविषयी अनुभवी आहेत.

सन २००९ मध्ये त्यांनी तत्कालीन औरंगाबाद (आताचे छत्रपती संभाजीनगर) मतदारसंघातून नशीब आजमावून पाहिले. त्या निवडणुकीत त्यांच्या पारड्यात तिसऱ्या क्रमांकाचे अर्थात एक लाख ४८ हजार मतांचे दान पडले होते. देव, देश आणि धर्मासाठी निवडणूक लढविण्याचा संकल्प शांतिगिरी महाराजांनी जाहीर केलेला आहे. हे महाराज पैसे मिळविण्यासाठी निवडणूक लढविणार नाहीत, असा नाशिककरांना विश्‍वास असल्याचा दावाही त्यांनी केला.

त्यांच्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडेल, असा आरोप होत असताना शांतिगिरी महाराजांनी खरे हिंदू कोण, हे पाहायला मिळेल, असे स्पष्ट केले. तसेच, आमचा लढा राष्ट्रहितासाठी असून, नाशिकचे प्रश्‍न सोडविण्यावर भर देणार असल्याची भूमिकाही त्यांनी जाहीर केली. महाराजांची भूमिका रास्त व सर्वांनाच पटणारी असली, तरी हे काम एखाद्या साधू-महंताचे नाही, तेथे जातीचेच असावे लागतात. (latest marathi news)

Shantigiri Maharaj and Siddheswarananda Saraswati
Nashik Lok Sabha Election : परराज्यातील ‘होमगार्ड’ बंदोबस्तासाठी येणार! सेक्टर अधिकाऱ्यांकडून ‘बुथ’वर नजर

जशा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत, तशा महंत आणि राजकारणी या दोन्ही बाबी एका मठाच्या छत्रछायेखाली कशा नांदू शकतील, हाही एक प्रश्‍न उपस्थित होतोच. साधू-महंतांनी निवडणूक लढविण्याची ही तशी पहिलीच वेळ आहे, असे नव्हे. यापूर्वी अजयसिंह बिष्ट उपाख्य योगी आदित्यनाथ यांनी १९९८ मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी बाराव्या लोकसभेत उत्तर प्रदेशच्या गोरखनाथ मतदारसंघातून सर्वांत तरुण खासदार होण्याचा मान पटकावला आहे.

त्यानंतर पाच वेळा खासदार आणि २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधान परिषद सदस्य, तसेच मुख्यमंत्री होण्याचे भाग्यही त्यांना लाभले. राम जन्मभूमी आंदोलनात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या उमा भारती यांनीही १९८९ पासून खजुराहो व भोपाळच्या खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश विधानसभेची आमदारकी तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे.

तात्पर्य, असे की मोजक्या साधू-महंतांच्या वाट्याला राजयोग आलेला आहे; परंतु त्यांनी आपले आयुष्य पूर्णपणे हिंदू धर्माच्या जागृती व प्रसारासाठी वाहून घेतले. एक मात्र ऋतंभरा यांच्यासारख्या साध्वी अपवादही ठरल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून साध्वी ऋतंभरा यांच्यासमोर निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

तेव्हा सदर प्रस्ताव नम्रपणे नाकारत त्या म्हणाल्या होत्या, ‘हमें राजनीति की दिशा बदलना पसंत है, राजनीति में शामिल होना नहीं।’ साध्वी ऋतंभरा यांच्या उदारमतवादी विचारांच्या तसेच कोणाही साध्वीला साजेशा अशा निर्णयामुळे त्यांच्याविषयीचा आदर नक्कीच कणभर का होईना वाढला असावा.

प्रत्येक साधू-महंताच्या वाट्याला राजसत्तेत यश येतेच, असे नव्हे. असे असले तरी समाजात राजसत्तेपेक्षा धर्मसत्तेत असलेल्या साधू-महंतांची जागा नेहमीच शीर्षस्थानी राहिली, याचे प्रत्यंतर वेळोवेळी देशभरात आले आहे. अनेक पक्षीय अध्यक्ष, मंत्री व मुख्यमंत्री आदी आपल्या हातावरील भाग्याच्या रेषा जाणून घेण्यासाठी, तर मुख्यमंत्रिपदाची शपथ कधी व केव्हा घ्यायची.

Shantigiri Maharaj and Siddheswarananda Saraswati
Nashik Lok Sabha Constituency : स्मार्ट मतदान कार्ड पावणेतीन लाख मतदारांकडे

याचा मुहूर्त काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत महाराज, साधू-महंत, ज्योतिषी वा ब्रह्मांडपंडितांच्या चरणी लीन झाल्याच्या घटना महाराष्ट्राला अपरिचित खचितच नाहीत. अशा वेळी प्रश्‍न उपस्थित होतो, की ज्यांच्यासमोर राजकारणातील बडे प्रस्थ श्रद्धेने वाकतात, नतमस्तक होतात, अशा साधू-महंतांनी राजकारण्यांच्या रांगेत जाऊन बसण्याचा अट्टाहास कशासाठी करावा?

यातून साधू-महंतांच्या समाजातील स्थानाला ठेच पोहोचते, त्यांचे महत्त्व कमी होते व क्रेझही घसरते. ते धर्मसत्तेत मोठे आहेत, त्यांनी तेथेच मोठे राहावे, असे ज्या भक्त परिवाराला व सामान्यजनांना वाटते, त्यांना या साधू-महंतांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयाने नक्कीच धक्का बसला आहे.

कोट्यधीश साधू-महंत!

साधू-महंत म्हटले, की भगवे वस्त्रधारी व माया-मोह यापासून लांब असलेली छबी आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सिद्धेश्‍वरानंद गुरुस्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती व शांतिगिरी महाराज हे दोघेही कोट्यधीश असल्याची बाब समोर आली आहे.

Shantigiri Maharaj and Siddheswarananda Saraswati
Nashik Lok Sabha Election : मतपत्रिका 32 लाख 70 हजार मतदारांना घरपोच

सोमेश्‍वरानंद सरस्वती यांच्याकडे सोन्याचा मुलामा असलेले पावणेतीन लाखांचे घड्याळ, टेम्पो, जेसीबी, बस अशी दीड कोटीची संपत्ती आहे; तर शांतिगिरी महाराजांकडे ३९ कोटींची मालमत्ता आहे. महाराजांचे वार्षिक उत्पन्न एक लाख ६२ हजारांच्या आसपास आहे. त्यांच्याकडे ७१ लाख ६८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असून, दागिने व जडजवाहिर नाहीत.

वाहने आणि स्थावर मालमत्तेत महाराजांची गुंतवणूक आहे. जमीन, भूखंड आणि तत्सम मालमत्तेचे आजचे बाजारमूल्य ३८ कोटी ८१ लाखांच्या घरात असून, त्यांच्यावर ७५ हजार रुपयांचे कर्जही आहे. आजवर त्यांनी ७० लाख ३५ हजारांची मालमत्ता खरेदी केली. छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, भोकरदन.

कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, सिन्नर, चांदवड, दिंडोरी, निफाड आणि रत्नागिरी आदी भागात त्यांच्या अर्धा एकर ते ११ एकरपर्यंत जमिनी आहेत. यातील काही जमिनी बक्षीसपत्राने, तर काही दानपत्राने प्राप्त झाल्या आहेत. जमिनीप्रमाणेच सफारी, टाटा टेम्पो, मालवाहू, डंपर, टीयूव्ही, टाटा ४०७, शालेय बस अशी ६७ लाख रुपयांची नऊ वाहने त्यांच्या नावावर आहेत.

Shantigiri Maharaj and Siddheswarananda Saraswati
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात कांदा, लिंबू अन् मोबाईल बंदी! निवडणूक आयोगाने घेतली धास्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.