चांदवड : गेल्या वीस वर्षांपासून लोकसभेसाठी चांदवड देवळा मतदारसंघातील मतदार भाजपच्या उमेदवारांच्या पाठिशी उभा राहिला आहे. यावेळी मात्र कांद्याचा मुख्य पट्टा असलेल्या या मतदारसंघात भाजपच्या उमेदवार डॉ. भारती उमेदवार यांच्यासाठी वाट थोडी अवघड झाली आहे. (Nashik Lok Sabha Constituency)
तरीही सुरूवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक भाजपच्या प्रचार यंत्रणेने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियोजनाने बऱ्यापैकी महायुतीच्या उमेदवाराला प्रवाहात घेऊन आली आहे. कोणाची प्रचारयंत्रणा किती परिश्रम घेते, यावरही बरेचसे चित्र अवलंबून आहे.
पंतप्रधान मोदींना मानणारा मतदार, भाजपचा मोठ्या संख्येने असलेला पारंपरिक मतदार, भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांचा मतदारसंघावर असलेला वरचष्मा ह्या डॉ. भारती पवार यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत तर केंद्र सरकारचे शेतीविरोधी धोरण, कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना बसलेला मोठा आर्थिक फटका.
दस्तुरखुद्द शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेले कांदा आंदोलन यासह शेतकऱ्यांमध्ये असलेला प्रचंड असंतोष या गोष्टी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे या वाढता पाठिंबा हि भगरेंची यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. या स्थितीत कार्यकर्त्यांपेक्षा शेतकऱ्यांनी निवडणूक हातात घेतलेली असल्याने आजतरी भास्कर भगरेंचे या मतदारसंघात पारडे जड वाटत आहे. तरीही उद्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या सभेनंतर काय फरक पडतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. डॉ. भारती पवार यांना केंद्रात आरोग्य राज्यमंत्रीपद मिळाले तरीही तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिलेला आहे. ट्रामा केअर सेंटर असून नसल्यासारखे आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदीही वादात अडकली आहे. या कांदा खरेदीचा शेतकऱ्यांना थेट फायदा झाला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (latest marathi news)
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यासह शेतकरी विरोधी धोरणामुळे या मतदारसंघात सुरूवातीला भारती पवार यांच्या विरोधात लाट तयार झाली होती. अनेक गावांत भारती पवारांना थेट विरोध झाल्याने त्यांच्या विरोधात असलेल्या या वातावरणाला भाजपच्या बाजूने वळविण्यासाठी भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व कसून कामाला लागलेले दिसत आहे.
आमदार डॉ. राहुल आहेर यांची यंत्रणाही कामाला लागल्याने डॉ.पवार यांना दिलासा मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे नवखे आहेत. त्यांचे स्वतःचे असे कार्यकर्ते या मतदारसंघात नाहीत. जेवढ्या आक्रमकपणे त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात बोलायला हवे तेवढे ते बोलत नाहीत.
भाजपच्या तुलनेत महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा कमकुवत आहे ही भगरेंची कमजोर बाजू आहे. तरीही माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचा मोठा चाहतावर्ग, मविप्र संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांची यंत्रणा अन् शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांची आक्रमक फळी या अर्थाने भगरे यांची बाजू भक्कम झाली आहे.
हे आहेत प्रश्न...
*औद्योगिक वसाहत पसल्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत.
* कायमस्वरूपी दुष्काळी तालुक्यात शेतीसाठी बारमाही पाणी नाही.
*अनेक वर्षांपासून मोठ्या धरणांची व शेतीसाठी बारमाही पाण्याची मागणी प्रलंबित
*पर्यटनाला पाहिजे तशी चालना नाही.
* कायमस्वरूपी कांदा निर्यात धोरण ठरवून कांदा पिकाला न्याय मिळायला हवा.
मतदार संख्या : चांदवड
पुरुष मतदार - १,५६,६४४
स्त्री मतदार - १,४२,६६०
एकूण मतदार - २,९९,३०४
सैन्यदल मतदार - ११३३
यापूर्वी काय झाले?
२०१४
हरिश्चंद्र चव्हाण - १,०८३८१
डॉ. भारती पवार - ३३५३२
२०१९
डॉ. भारती पवार -१२०७०३
धनराज महाले - ४००८४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.