Nashik Lok Sabha Constituency : निवडणूक रणधुमाळीत हजारो हातांना काम!

Nashik News : मंडप, बॅनर, फुले, हार फुलांची उधळण करण्यासाठी जेसीबी, फटाके, डीजे, सफारी हार अशा सर्वच यंत्रणेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन हजारो हातांना काम व करोडोंची उलाढाल होत आहे.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal
Updated on

Nashik News : सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणुका म्हटल्या का प्रचार आला आणि मग त्या अनुषंगानेच कार्यकर्ते, यंत्रणा, पोस्टरबाजी आलीच. प्रचाराच्या तापलेल्या वातावरणामुळे कार्यकर्ते व प्रचार यंत्रणा राबविणाऱ्या अनेक घटकांना सुगीचे दिवस आले आहे. (Thousands of people get work in election)

कार्यकर्ते, पत्रक, केटरिंग, साउंड सिस्टिम, मंडप, बॅनर, फुले, हार फुलांची उधळण करण्यासाठी जेसीबी, फटाके, डीजे, सफारी हार अशा सर्वच यंत्रणेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन हजारो हातांना काम व करोडोंची उलाढाल होत आहे. कमी कष्टामध्ये चांगला मोबदला मिळत असल्यामुळे परिणामी बाजारापेठेही चैतन्य आले आहे. निवडणुकीमुळे आर्थिक चक्रही गतिमान झाले आहे.

सध्या अनेकांना या निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांना मागील १२-१५ दिवसापासून निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेसाठी आणि इतर कामकाजासाठी मनुष्यबळ वाढले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने रोजगार इतका सहज उपलब्ध झाला आहे, की फक्त उमेदवार अथवा नेत्याच्या मागे वावरण्यासाठी ही पाचशे ते सातशे रुपये सहज मिळतात. मग तो कुठलाही पक्ष असो. विशेष म्हणजे याला एकही पक्ष अपवाद नाही.

प्रचार पत्रक घरोघरी पोचविणे यासाठी विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर रोजंदारीवर महिला व पुरुषांना घेतले जात आहे. यामध्ये पक्षाची पट्टी गळ्यात टाकायची अन् घोषणा देणे व मागे फिरणे एवढेच काम करावे लागत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळेची मर्यादा असते. काहीजण मध्येच रॅलीत केवळ फिरणे एवढेच काम असते. उमेदवाराकडून नाश्ता आणि जेवणाची सोय राहत असल्यामुळे उत्साहात सहभागी होत आहेत. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik News : मोदींकडे देशाच्या विकासाची पुढच्या 25 वर्षांची ‘ब्ल्यू प्रिंट’ : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

मजूर अड्डे सुनेसुने

दररोज सकाळी शहरातील विविध भागांतील गजबजून असणारे मजूर अड्डे सध्या मात्र सुनेसुने दिसत आहेत. दररोज मजुरी काम करून मिळणाऱ्या पैशापेक्षा निवडणुकीत प्रचार करून अधिक पैसे मिळत असल्याने इतर कामांना मजूर मिळत नाहीत. मिळणाऱ्या पैशाबरोबर जेवण व नाश्ता मिळतो. त्यामुळे कामावर मजूर दांड्या मारत आहेत. अनेक ठेकेदार यामुळे कमालीचे हैराण झाले आहेत. बेरोजगार तरुणांचा कल सध्या प्रचार रॅलीतील कामात असल्याचे दिसून येत आहे.

मंडपवाल्यांना अधिक मागणी

विविध उमेदवारांनी जागोजागी प्रचार कार्यालय थाटल्याने मंडपवाल्यांना चांगले दिवस आले आहेत. याशिवाय दररोज कुठे ना कुठे कॉर्नर, जाहीर सभा होत असल्याने माईक सिस्टिम, खुर्च्या, स्टेज, डेस्क, लाइट यांची व्यवस्था करावी लागते. त्यामुळे मंडप डेकोरेटर्स चालकांची सध्या आनंदाचे वातावरण आहे. तसेच बल्क मेसेज व ग्रुप कॉलिंग च्या माध्यमातून अनेक एजन्सींना मोठ्या प्रमाणात उत्पन्न व रोजगार उपलब्ध झाला आहे.

५००हून अधिक कार्यकर्त्यांना जेवण

प्रत्येक उमेदवाराला दररोज किमान ५००हून अधिक कार्यकर्त्यांना जेवण द्यावे लागत आहे. याशिवाय प्रभागातील मतदारांसाठीची जेवणावळ वेगळी. यामुळे हॉटेल्स, खानावळ सध्या हाऊसफुल्ल आहेत. तेथे नियमित काम करणारे कामगार व वेटर यांच्या व्यतिरिक्त जादा या कामगारांनाही दररोज जास्त रोजगार मिळत आहे.

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात जनमत स्थानिकाच्या बाजूने

बॅनर्स, स्टिकर, झेंडे बनविणारे, डिझाइन बनविणारे यांनादेखील रोजगार मिळाला आहे. या सर्व माध्यमांतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. हा सर्व पैसा साहजिकच बाजारात येत असल्यामुळे बाजारातील उलाढालही कमालीची वाढली आहे.

गर्दीसाठी महिला व तरुणांना जास्त मागणी

डिजिटल मीडियाची चांदी

केटरिंग व्यवसाय तेजीत

साउंड सिस्टिम, खुर्च्या टेबलला अधिक मागणी

प्रिंटिंग प्रेस व्यवसाय जोरात

रिक्षा व छोटा हत्तीला वाढती मागणी

Nashik Lok Sabha Constituency
Nashik City Transport : गायकवाड सभागृह परिसरात वाहतूक बंदी! उद्यापासून अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()