Nashik Lok Sabha Election 2024 : अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने महापालिकेची कानउघाडणी!

Lok Sabha Election 2024 : २० मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ४ जूनला मतमोजणी होईल.
NMC News
NMC Newsesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी मतमोजणी केंद्रांवर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात महापालिकेसह विविध शासकीय यंत्रणांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाराजी व्यक्त करत महापालिकेची कानउघाडणी करण्यात आली. २० मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे ४ जूनला मतमोजणी होईल. (Nashik Lok Sabha Election 2024 basic features NMC news)

अंबड येथील वेअर हाऊस येथे मतमोजणीचे नियोजन आहे. त्याअनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस पोलिस उपायुक्त, केंद्रीय वखार महामंडळाचे व्यवस्थापक, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, महापालिकेच्या अग्निशमन अधिकारी तसेच स्वच्छता विभागाचे उपायुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा शल्य चिकित्सक, महावितरणचे कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे उपायुक्त तसेच कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. (Latest Marathi News)

NMC News
NMC Tax Recovery: कर सवलत योजना महापालिकेला पावली! 64 कोटींचा भरणा; 6 टक्के मालमत्ताधारकांना योजनेचा लाभ

परंतु प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना होत्या. त्या अधिकाऱ्यांनी प्रतिनिधी पाठविल्याने ही बाब गंभीर घेत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. मतदान व मतमोजणी या दोन्ही प्रक्रिया महत्त्वाच्या असल्याने सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंच विभागांचे सहकार्य अपेक्षित आहे. मतदान केंद्रांची दुरुस्ती, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन, विद्युत आदी प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी त्या विभागांचे सहकार्य गरजेचे आहे. परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या नाराजीच्या पत्रावरून अन्य विभागांकडून सहकार्य मिळत नसल्याचे स्पष्ट होते.

NMC News
Nashik NMC News : मनपाची ऑनलाइन सेवा विस्कळित! 8 तासानंतरही सर्व्हर डाऊन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.