Nashik Lok Sabha Election 2024 Result : दिंडोरीच्या अगोदर नाशिकच्या उमेदवाराने उधळला गुलाल

Nashik News : उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीला कौल दिला.
rajabhau waje
rajabhau wajeesakal
Updated on

Nashik News : उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीला कौल दिला. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे यांना तब्बल दहा हजारांची आघाडी मिळाली. तर दिंडोरीत भास्कर भगरे यांनी तीन हजारांची आघाडी घेत आपले खाते उघडले. (Nashik Lok Sabha Election 2024)

नाशिकमध्ये एकूण ३० फेऱ्या असताना दुपारी दोनलाच वाजेंचा विजय निश्‍चित झाला आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दिंडोरीत २६ फेऱ्या असतानाही अपक्ष उमेदवार बाबू भगरे या नामसाध्यर्म्य असलेल्या उमेदवारामुळे भास्कर भगरे यांचे विजयी मताधिक्य कमी झाले. त्यांना विजयाची काही काळ वाट बघावी लागली.

लोकशाहीचा सर्वांत मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत मंगळवारी (ता. ४) अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूमध्ये सकाळी आठला मतमोजणीस प्रारंभ झाला. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण ३१ उमेदवार रिंगणात होते. दिंडोरीत अवघे दहा उमेदवार रिंगणात असल्यामुळे दिंडोरीचा निकाल आधी घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु पहिल्या फेरीपासूनच जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला.

पोस्टल मतदानापासून प्रक्रियेस प्रारंभ झाला. त्याचबरोबर सकाळी साडेआठला कंट्रोल युनिट अर्थात, ‘ईव्हीएम’मधील मतमोजणीस सुरवात झाली. पहिल्या दहा फेऱ्यांपर्यंत प्रत्येक उमेदवार प्रतिनिधींचा उत्साह कायम दिसून आला. परंतु मतमोजणी पुढे सरकत असतानाच महायुतीच्या उमेदवार प्रतिनिधींचा उत्साह मावळला. त्यांनी लागलीच काढता पाय घेण्यास सुरवात केली. डॉ. भारती पवार यांचे पती प्रवीण पवार व त्यांचे समर्थक उपस्थित होते. (latest marathi news)

rajabhau waje
Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

मतदारांचा कौल लक्षात येताच दुपारीच ते मतमोजणी केंद्रातून बाहेर पडले. दहाव्या फेरीनंतर भास्कर भगरे यांची आघाडी वाढत गेल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचे दिसून आले. २६ व्या फेरीअखेर भगरे यांना एक लाख १३ हजार मतांची आघाडी मिळाली, तर नाशिक लोकसभा मतदारसंघात राजाभाऊ वाजे एक लाख ६१ हजार १०३ मतांनी विजयी झाले.

नाशिकमध्ये एकूण ६०.७५ टक्के, तर दिंडोरीत ६६.७५ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी नाशिकमध्ये १२ लाख ३३ हजार २५२ मते वैध ठरली. दिंडोरीत १२ लाख ४१ हजार ९८५ मते वैध ठरली. जिल्हाधिकारी जलज शर्मा नाशिकचे निवडणूक निर्णय अधिकारी राहिले. अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी होते.

प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी एकूण ४८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या सोबत उपजिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदार दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले. विशेष म्हणजे मतमोजणी करताना एकाही कंट्रोल युनिटमध्ये बिघाड झाल्याची तक्रार उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींकडून नोंदवण्यात आली नाही.

rajabhau waje
Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष

महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी घोषित झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण आणि ढोल-ताशां‍च्या गजरात नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे व दिंडोरीचे भास्कर भगरे यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष केला. ‘जिल्ह्यात एकच नाव गाजे, राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

निवडणुकीची वैशिष्ट्ये

-डॉ. भारती पवार यांच्यापेक्षा भास्कर भगरे यांचे नियोजन उजवे ठरले

-पहिल्या दहा फेऱ्यांपर्यंतच उमेदवार प्रतिनिधींमध्ये उत्साह

-सकाळी सातला आलेल्या मतमोजणी कर्मचाऱ्यांना दुपारी दोनला मिळाले जेवण

-दुपारी पावणेचारला संपली दिंडोरीची शेवटची फेरी

-नाशिकची शेवटच्या फेरीची मोजणी सायंकाळी सहाला संपली

-मतमोजणी केंद्रावर उमेदवार दाखल होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष

-मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त

-प्रत्येक नाक्यावर पोलिसांकडून तपासणी

-दिंडोरीची आठ, तर नाशिकची दहा तास मतमोजणी

rajabhau waje
Nashik Lok Sabha Election 2024 Result : ‘डमी’ भगरे हरले, ‘ओरिजनल’ भगरे जिंकले!

"महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनतीने आणि प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांचा मी ऋणी आहे. संपूर्ण राज्यभरात एकंदरीत महाविकास आघाडीकडे कौल असल्याच दिसून येत असून जनतेने दिलेला कौल मी मोठ्या मनाने आणि सन्मानाने स्वीकारत आहे. यापुढे देखील जनतेसाठी तत्पर राहणार आहे. माझ्या कार्यकाळात अनेक मोठे प्रकल्प मंजूर झाले असून ते येत्या काळात नक्कीच कार्यान्वित होतील अशी मी विजयी उमेदवाराकडून अपेक्षा ठेवतो. नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध राहील अशी आशा देखील बाळगतो व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देतो." - हेमंत गोडसे, पराभूत उमेदवार,नाशिक.

"माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नाशिककर जनता आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांना आहे. नाशिकच्या जनतेने असली शिवसेना आणि नकली शिवसेनेचा फैसला करून दिलेला आहे. माझा विजय निश्चित होता, याची मला खात्री होती. नाशिककरांच्या मदतीने आज मी मोठी लढाई जिंकली आहे. आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. माझ्या विजयासाठी सिन्नरच्या जनतेने संपूर्ण मतदारसंघात प्रचार करून मला विजयापर्यंत पोचविले आहे. आजचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर उद्यापासून मी नाशिककरांच्या सेवेसाठी हजर राहणार आहे." - राजाभाऊ वाजे, नवनिर्वाचित उमेदवार, नाशिक लोकसभा मतदारसंघ

rajabhau waje
Nashik Lok Sabha Election 2024 Vote Counting: नाशिक, दिंडोरीत महाविकास आघाडीची आघाडी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.