Nashik Lok Sabha Election : नाशिकमध्ये शिंदे विरुद्ध ठाकरे सामना! 'या' मुद्द्यांमुळे गोडसेंना निवडणूक जड जाणार

Nashik Lok Sabha Election 2025 : नाशिक लोकसभा निवडणुकीकडे सध्या सपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election
Updated on

Nashik Lok Sabha Election 2025 : नाशिक लोकसभा निवडणुकीकडे सध्या सपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोन वेळा खासदार राहिलेले एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे नेते हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या सेनेने राजाभाऊ वाजे यांना मैदानात उतरवले आहे. या निवडणुकीत नेमके कोणते मुद्दे महत्वाचे ठरणार? याचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत.

नाशिक लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला तो महायुतीच्या उमेदवाराची लवकर घोषणा न झाल्याने चांगलाच चर्चेत आला होता. हा मतदारसंघ कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना या पक्षांकडे राहीला आहे. यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर करताना फार उशीर करण्यात आला. त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचारासाठी जास्त दिवसांचा कालावधी मिळाला आहे. याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन टर्ममध्ये हेमंत गोडसे विजयी होत आले आहेत. यामध्ये एकवेळा मराठा विरूद्ध भुजबळ या वादाचा फायदा गोडसे यांना झाला. तर दुसऱ्यांदा मोदी लाटेत त्यांना यश मिळालं. पण मागील १० वर्षात नाशिकला काय मिळालं याचा विचार केला तर नागरिकांच्या पदरी निराशाच पडली आहे.

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात जनमत स्थानिकाच्या बाजूने

नाशिक पुणे रेल्वे मार्गाचं भूसंपादन, तसेच सेमी हायस्पीड रेल्वेची घोषणा झाली पण तो प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकरचा अर्थसंकल्प २०२० साली सादर झाला, यामध्ये नाशिकमध्ये टायर बेस्ट मेट्रो नियो प्रकल्पाची घोषणा झाली होती. पण त्या प्रकल्पाचा नारळ अद्याप फुटलेला नाही. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत तो प्रस्ताव अद्याप पूर्ण झालेला नाही. ते आश्वासन देखील अद्याप प्रतिक्षेतच आहे.

नाशिकच्या विकासासाठी शहरात आयटीपार्क आणि लॉजिस्टीक पार्क आणण्याची घोषणा करण्यात आली, पण अद्यापही हे प्रकल्प कागदावरच आहे. आयटी पार्कसाठी देखील काही प्रयत्न झाले नाहीत. नाशिकमध्ये कृषी प्रक्रिया उद्योगाची घोषणा होऊनही अद्याप त्याची अमंलबजावणी झाली नाही.

Nashik Lok Sabha Election
Loksabha Diary : कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप, नाशिक, दिंडोरीत महायुतीचं टेन्शन वाढलं...

नाशिकमध्ये औद्योगिकीकरणाचा विस्तार करण्यासाठी नवीन अतिरीक्त एमआयडीसी जाहीर करावी अशी मागणी औद्योगिकांकडून केली जात आहे, ती देखील अद्याप प्रलंबित आहे. तसेच विमान सेवेचा विस्तार झाला आहे पण ती सेवा देखील अखंडीत राहात नाही, हा मुद्दा देखील सध्या चर्चेत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात देशातील राजकारणात चर्चेत असलेल्या मुद्द्यांचा फारसा फरक जाणवत नाही. अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन सुरू असताना नाशिकच्या काळाराम मंदिरात नेत्यांनी दर्शन घेत होते. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा तेवढ्यापुरताच चर्चेत राहिल्याचं शहरातील नागरिक सांगतात.

Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : मद्य, पैसा, सोशल मीडियावर विशेष लक्ष; नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघांचा आढावा

नाशिकमध्ये सध्या बेरोजगारी हा विषय सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. मुंबई-पुणे या शहरांच्या तुलनेत कमी रोजगार येथे आहेत. नाशिकमध्ये वाढीला संधी असून देखील येथे विकास होत नाही याची खंत नागरिकांमध्ये आहे. तसेच नाशिकला धार्मिक महत्व आहे, असे असताना येथे धार्मिक अंगाने देखील काही विकासकामे झालेली नाहीत.

नाशिकमध्ये आयटी इंजिनियर विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीसाठी मुंबई-पुणे गाठावे लागते. तसेच येथे मेडिकल कॉलेजचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले आहे. पर्यटन वाढीसाठी मोठ्या संधी असताना देखील नाशिकच्या पर्यटनासाठी पुरेशा सोयी पुरवल्या गेल्या नाहीत, अशी खंत येथे व्यक्त होताना दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.