नाशिक : शिवसेनेच्या शिंदे गटाने नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडेच असावी व त्यातही विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर आंदोलन केल्यानंतर त्याचे पडसाद आज नाशिक शहराच्या राजकारणात उमटले. (Nashik Lok Sabha Election 2024)
शहरातील तीन व ग्रामीणचे एक अशा चारही आमदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेत नाशिकचा खासदार कमळाचाच अशी भूमिका स्पष्ट केली. नाशिकच्या जागे संदर्भात लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी देण्यात आल्याचे समजते. नाशिकच्या जागे संदर्भात भाजपमधील इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024 BJP MLA statement MP belongs to bjp Response to Shinde Sena demand in Mumbai marathi news)
राज्यात लोकसभेच्या निवडणुकांचे राजकारण तापले आहे विविध ठिकाणी महायुती व महाविकास आघाडी मध्ये उमेदवारीवरून वाद सुरू आहे. नाशिकमध्ये देखील जागेवरून वाद सुरू झाले आहेत. 12 मार्चला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी परस्पर जाहीर करत नाशिककरांना सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचा खासदार निवडून देण्याचे आवाहन केले.
त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रोटोकॉल नुसार महायुतीच्या उमेदवाराची घोषणा करण्यापूर्वी जागा निश्चिती होईल, जागा निश्चिती नंतर उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल. त्यासाठी पक्षाच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक होणे अपेक्षित आहे, त्यानंतरच उमेदवाराची घोषणा करता येईल, अशी भूमिका घेत भाजपच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर पक्षाचे महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकचा खासदार कमळाचा, अशी जोरदार भूमिका घेत अन्नत्याग करण्याचा इशारा देखील दिला. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत नाशिकच्या जागे संदर्भात वरिष्ठांकडे मागणी केली.
महायुतीच्या जागा वाटपात नाशिक संदर्भात निर्णय झाला नसताना रविवारी रात्री शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर शिवसेनेला जागा मिळावी यासाठी जोरदार आंदोलन केले. पालकमंत्री दादा भुसे यांनी ठिय्या मांडला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच शिंदे यांच्या निवासासमोर आंदोलन झाल्याने राजकारण ढवळून निघाले. मुख्यमंत्री शिंदे यांना आंदोलनाची दखल घ्यावी लागली. शिवसेनेच्या नेत्यांना आंदोलन यशस्वी झाल्याचे वाटत असताना शिवसेनेच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून भाजपच्या चारही आमदारांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर धडक दिली. (latest marathi news)
आता तरी भाजपचा उमेदवार द्या
आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, वरिष्ठ नेते दिनकर पाटील, लोकसभा संघटक केदा नाना आहेर, सुरेश आण्णा पाटील, महेश हिरेतमी , जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव आदींनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेतली.
नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. महापालिकेत ६५ नगरसेवक निवडून आले होते. मागील वीस वर्षांपासून भाजपचे मतदार असूनही युती धर्म पाळण्यासाठी उमेदवार दिला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपचाचं उमेदवार देण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.