Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवार अनिश्चिततेमुळे महायुतीमधील इच्छुकांची घालमेल

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे पस्तीस दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या तुलनेत नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने तुर्त तरी बाजी मारली आहे.
Mahayuti
Mahayutiesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे पस्तीस दिवस शिल्लक राहिल्याने महाविकास आघाडी व महायुतीच्या तुलनेत नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने तुर्त तरी बाजी मारली आहे. महायुतीमध्ये जागा कुठल्या पक्षाला व उमेदवार निश्चिती अद्याप दूर असल्याने महायुतीमधील इच्छुकांची घालमेल वाढली आहे. पुढील पस्तीस दिवसांमध्ये ग्रामीण भागात पोहोचण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या उमेदवारासमोर राहणार असल्याचे दिसून येत आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 Confusion of aspirants in mahayuti news)

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी व महायुतीमध्ये सरळ लढत होणार असल्याचे तुर्त तरी दिसून येत आहे. २० मे रोजी निवडणूक असल्याने अध्यापक महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही. त्यातही भाजप राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेचा शिंदे गट कोणाला जागा सोडावी याबाबत मात्र अद्यापही अनिश्चितता आहे.

पारंपरिक पद्धतीने शिवसेनेने जागेची मागणी केली आहे तर शहरांमध्ये तीन आमदार असल्याने भाजपला नाशिकची जागा हवी आहे तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा हवी आहे. महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागेवरून वाक्‌युद्ध रंगले आहे.

इच्छुकांच्या मुंबईच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे मुंबईवरून इच्छुक परतताना फक्त आश्वासन घेऊन येतात, ठोस असा निर्णय होत नसल्याने घालमेल वाढली आहे. महायुतीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या दावे व प्रतिदावे वाढले आहेत. (Nashik Political News)

Mahayuti
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे काँग्रेस सावध; विश्‍वजित, पृथ्वीराज, सावंतांना नागपूरला पाचारण

जागा आम्हालाच मिळणार असा दावा दोन्हीकडून केला जात आहे. २० मे रोजी मतदान असल्याने अद्याप जागे संदर्भात निर्णय धिम्या गतीने घेतला जात आहे. त्याचा परिणाम उमेदवारांच्या हाती अवघे ३५ दिवस शिल्लक राहत असल्याने इच्छुकांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

महिन्याभरात दमछाक

महाविकास आघाडीकडून पंधरा दिवसांपूर्वी उमेदवारी जाहीर झाल्याने संबंधित उमेदवार व समर्थकांनी ग्रामीण भाग विंचूर काढला आहे. शहरी भागातही विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटीगाठी होत असल्याने महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीचा प्रचार एक पाऊल पुढे गेला आहे. महायुती मात्र अद्यापही चाचपडत असल्याने उमेदवारी जाहीर झाल्यास उमेदवाराला मोठी दमछाक करावी लागणार आहे.

Mahayuti
Lok Sabha Poll : भाजप कडून जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांना ऊमेदवारी? खोडसाळ पत्राने जिल्ह्यात खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()