Lok Sabha Election 2024 : राज्यात 91 टक्के उमेदवारांची ‘अनामत’ जप्त; ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडीसह सपचा समावेश

Lok Sabha Election : मतांचा अपेक्षित पल्ला न गाठल्याने यंदाच्या १८ व्या लोकसभेत राज्यातील तब्बल ९१ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
prakash shendge
utkarsha rupwate
panjabrao dakh
chandrahar patil
vasant more
shantigiri maharaj
prakash shendge utkarsha rupwate panjabrao dakh chandrahar patil vasant more shantigiri maharajesakal

Lok Sabha Election 2024 : जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार दिल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक जण निवडणूक लढवितात. परंतु, निवडणुकीत मतदारांची पसंती न मिळाल्यास मतांचा अपेक्षित पल्ला न गाठल्याने यंदाच्या १८ व्या लोकसभेत राज्यातील तब्बल ९१ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पक्षासह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. (deposit of 91 percent candidates in state confiscated )

यंदा भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या राजकीय भूकंपामुळे लोकसभा निवडणूक लढविणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. यंदाच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्याने महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपला देशात बहुमत मिळूनही ‘जोर का झटका’ बसला. विशेष म्हणजे निवडणुकीच्या आखाड्यातील एक हजारांहून अधिक उमेदवारांनी मतपेटीतून गमावलेली पत यंदाच्या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य ठरले.

यंदाच्या लोकसभा निवडणूक आखाड्यातील राज्यात सुमारे ९१ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत एक हजार १२१ रिंगणातील उमेदवारांपैकी तब्बल एक हजार २५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे ‘लोकसभेची निवडणूक नको रे बाबा’ म्हणायची वेळ पुढाऱ्यांवर येऊन ठेपली आहे. (latest marathi news)

prakash shendge
utkarsha rupwate
panjabrao dakh
chandrahar patil
vasant more
shantigiri maharaj
Lok Sabha Election 2024 : राजघराण्यांवर जनतेचा विश्‍वास; विविध राज्यांमधील उमेदवारांचा विजय

असे होते डिपॉझिट जप्त

१९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, लोकसभा निवडणुकीत सर्वसाधारण उमेदवाराला २५ हजार रुपये, तर अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवाराला १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठीही लोकसभेसारखीच अनामत रक्कम द्यावी लागते. निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांच्या एक षष्टांश मते न मिळाल्यास उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले जाते. त्यानुसार यंदा सर्वाधिक वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

डिपॉझिट जप्त झालेले काही उमेदवार (कंसात मिळालेली मते)

*हिंगोली : वंचित बहुजन आघाडीचे डॉ. बी. डी. चव्हाण (एक लाख ५० हजार)

*सांगली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (६० हजार ८६०)

*नाशिक : शांतिगिरी महाराज (४४ हजार ५२५)

*नाशिक : वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर (४७ हजार)

*पुणे : वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे (३२ हजार)

*परभणी : वंचित बहुजन आघाडीचे पंजाबराव डख (९५ हजार ९७६)

*सांगली : प्रकाश शेंडगे (८ हजार)

*शिर्डी : वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रूपवते (९० हजार)

prakash shendge
utkarsha rupwate
panjabrao dakh
chandrahar patil
vasant more
shantigiri maharaj
Dhule Lok Sabha Election 2024 Result : मालेगाव बाह्यमध्ये भामरेंना मताधिक्क्य, डॉ. बच्छावांचीही पाठराखण!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com