Nashik Lok Sabha Constituency : बारामतीचा तिढा संपला; दिंडोरीत मात्र डोकेदुखीत वाढ

Lok Sabha Constituency : महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नसताना दिंडोरीतही भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Harishchandra Chavan
Harishchandra Chavan esakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : महायुतीचा नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला नसताना दिंडोरीतही भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तीन वेळा खासदार राहिलेले हरिश्‍चंद्र चव्हाण यांना उमेदवारी न मिळाल्याने ते बंडखोरीच्या तयारीत आहेत. चव्हाण यंदा उमेदवारीवर ठाम असून कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे महायुतीमधील बारामतीचा पेच सुटला असला तरी, बंडखोरीने दिंडोरीचा पेच वाढला आहे. (Nashik lok sabha election 2024 dindori constituency ex mp Harishchandra Chavan will be revolt marathi political news)

लोकसभा निवडणुकीची धूम सर्वत्र सुरु आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नेते बंड करण्याच्या भूमिकेत आहेत. असे अनेक बंड थोपवताना वेगवेगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची दमछाक होत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आले आहे. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघामुळे आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

भाजपचे तीन वेळा दिंडोरीचे प्रतिनिधीत्व करणारे माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना तिकीट देत पुन्हा रिंगणात उतरविले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या प्रचार करत आहेत. काहीही झाले तरी मीच जिंकणार, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीवर चव्हाण यांनी खुली नाराजी व्यक्त केली होती.

त्यावेळी त्यांनी उमेदवारी करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यासाठी चव्हाण यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने (शरद पवार गट) पक्षाशी एकनिष्ठ भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे चव्हाण यांनी बंडखोरी करण्याची तयारी केली. त्यांच्याकडून मतदारसंघात शांतिगिरी महाराजांसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. (latest marathi news)

Harishchandra Chavan
Jalgaon Lok Sabha Constituency : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे रविंद्रभैय्या, श्रीराम पाटील की चौधरी?

चव्हाण सन २००९ व २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, सन २०१९ च्या निवडणूकीत त्यांना डावलून डॉ. भारती पवार यांना पक्षाने उमेदवारी दिली. पहिल्याच टर्ममध्ये खासदार झालेल्या भारती पवार यांना केंद्रात राज्यमंत्रीपद देखील देण्यात आले.

दरम्यान, चव्हाण हे बंडखोरी करून थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी ठाम असल्यामुळे भारती पवार तसेच महायुतीपुढे पेच वाढण्याची शक्यता आहे. चव्हाण यांचे बंड थंड करण्याचे महायुतीपुढे आव्हान असणार आहे. त्यामुळे नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

''गत निवडणुकीत मला तिकीट देण्यात आले नव्हते. यंदा मात्र, पक्षाकडून मला तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. डॉ. भारती पवार यांच्याबद्दल मतदारसंघात असंतोष आहे. मी उमेदवारी करावी अशी मतदारसंघातील लोकांची तसेच भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.''- हरिश्‍चंद्र चव्हाण (माजी खासदार, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ)

Harishchandra Chavan
Nashik Lok Sabha Constituency : सकल मराठा समाजाचा उमेदवार देणार टक्कर! गायकर, बच्छाव, बनकर यांची नावे चर्चेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.