Nashik Lok Sabha 2024: गोडसे समर्थकांचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन! नाशिकच्या जागेवर भाजपने दावा केल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ

Political News : खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली
hemant Godse supporters stage show in Thane with cm shinde
hemant Godse supporters stage show in Thane with cm shindeesakal
Updated on

नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता.२४) सायंकाळी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवास्थानासमोर ठिय्या मांडत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास फरांदे यांच्यासह पदाधिकारी व शेकडो पदाधिकाऱ्यानी नाशिकची जागा शिवसेनेला सोडण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री साडेदहा वाजेला आंदोलकांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले. तसेच नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळणार असल्याची शाश्वती त्यांनी आंदोलकांना दिली. (Nashik Lok Sabha election 2024 hemant Godse supporters stage show in Thane marathi news)

खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार गोडसे यांच्या उमेदवारीला थेट विरोध करीत पक्ष कार्यालयात नाशिकचा खासदार कमळाचा हवा असे जणू शिवसेनेला आव्हानच दिले. यानंतर खासदार गोडसे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन उमेदवारीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला.

परंतु भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यासाठी उशीर होत असल्याचे लक्षात येताच खासदार गोडसे यांच्यासह पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, संपर्कप्रमुख सूर्यकांत लवटे, गणेश कदम, जयंत साठे, हरीश भडांगे, नितीन खर्जुल, नानू साळवे, कोमल साळवे यांच्यासह सुमारे अडीचशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानासमोर ठिय्या मांडला.  (latest marathi news)

hemant Godse supporters stage show in Thane with cm shinde
Nashik Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची एक खिडकी योजना! पहिल्याच दिवशी शांतिगीरी महाराजांना प्रचारासाठी हव्या 5 गाड्या

यावेळी गोडसे समर्थनार्थ घशेषणाबाजी करण्यात आली. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे हे काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण शिवसैनिकांचे लक्ष लागून होते, यादरम्यान आमदार कांदे यांनी आपल्या भाषणात हेमंत गोडसे यांनी दोन वेळा राष्ट्रवादीचे काका व पुतणे यांना पराभूत केले आहे. त्यामुळे ते सक्षम उमेदवार असून त्यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली.पालकमंत्री दादा भुसे यांनी गोडसे यांच्यासाठी थेट रस्त्यावरच ठिया मांडला. त्यामुळे शिवसेना आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान रात्री साडेदहा वाजेला मुख्यमंत्री शिंदे हे ठिय्या मांडलेल्या आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांच्या भेटीला आले आणि त्यांनी नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार असल्याची ग्वाही दिली. त्यासाठी आपणा सर्वांना काम करायचे असल्याचे सांगितले. रात्री साधारणत: एक तासभर पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांना करावा लागला.

hemant Godse supporters stage show in Thane with cm shinde
Nashik Lok Sabha Election 2024: साडेतीनविरुद्ध अडीच मतदारसंघांची लढाई! शहरी मतदारांचा प्रभाव अधिक, ग्रामीण भागाचा पगडा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.