Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे, भास्कर भगरेंसह 5 अर्ज दाखल

Political News : महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे पराग (राजाभाऊ) वाजे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
Rally of Rajabhau waje & Bhaskar Bhagare
Rally of Rajabhau waje & Bhaskar Bhagareeaskal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे पराग (राजाभाऊ) वाजे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दिंडोरीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

नाशिक व दिंडोरीमध्ये एकूण पाच इच्छुकांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात नाशिकसाठी राजाभाऊ वाजे, सैनिक समाज पार्टीतर्फे जयश्री महेंद्र पाटील, शांतीगिरी महाराज व वंचित बहुजन आघाडीतर्फे देविदास पिराजी सरकटे या चार उमेदवारांनी अर्ज सादर केला. तर दिंडोरी लोकसभेत भास्कर भगरे यांचा एकमेव अर्ज सादर झाला. (Nashik Lok Sabha Election 2024 Mahavikas Aghadi news)

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणुकीची नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रीया शुक्रवार (ता.२६) एप्रिलपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी दिंडोरीसाठी १७ इच्छुकांनी ४० तर नाशिकसाठी ४७ इच्छुकांनी ८७ असे एकूण ६४ उमेदवारांनी १२७ नामनिर्देशनपत्र खरेदी केली.

शनिवार आणि रविवारच्या सार्वजनिक सुटीनंतर सोमवारी (ता.२९) पुन्हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी ११ पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची वर्दळ सुरू झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत ही वर्दळ कायम होती. इच्छुकांसमवेत चारपेक्षा अधिक व्यक्ती नसल्याची खात्री करूनच आत प्रवेश दिला जात होता.

नाशिक लोकसभेसाठी सकाळी ११ ते दुपारी तीन या चार तासांत एकूण २६ जणांनी ४२ उमेदवारी अर्ज खरेदी केले.नाशिक लोकसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढतच आहे. आतापर्यंत ७३ जणांनी एकूण १०६ उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. ३ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असल्याने इच्छुकांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक, दिंडोरीसाठी ९९ इच्छुकांनी घेतले अर्ज

लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२९) दिवसभरात नाशिक लोकसभेसाठी २६ इच्छुकांनी ४२ तर दिंडोरीसाठी नऊ इच्छुकांनी २१ उमेदवारी अर्ज नेले. त्यामूळे दिवसभरात एकूण ३५ उमेदवारांनी ६३ अर्ज खरेदी केले आहेत. आतापर्यंत दोन्ही मतदारसंघांमध्ये मिळून ९९ इच्छुकांनी एकूण १९० उमेदवारी अर्ज खरेदी केले आहेत. (Latest Marathi News)

Rally of Rajabhau waje & Bhaskar Bhagare
Dindori Lok Sabha: सरकारला लाल कांद्याची नव्हे; पांढऱ्या कांद्याची चिंता! रॅलीद्वारे भास्कर भगरे यांनी दिंडोरीतून दाखल केला अर्ज

नाशिकमधून यांनी घेतले अर्ज

अनिकेत देशपांडे, संजय काकड, लिलाधर जाधव, गणेश बोरस्ते, भिमराव जाधव, जयश्री पाटील, माया बागूल, भारद्वाज पगारे, विजय करंजकर, अनिता विजय करंजकर, माधुरी पढार, तिलोत्तमा जगताप, शत्रुघ्न झोंबाडे, ताराचंद लहांगे, सय्यद अकबरअली, अनिला गांगुर्डे, रामदास शिंदे, शंकर विधाते, निवृत्ती अरिंगळे, सूरज ताजनपुरे, शशिकांत उन्हवणे, रमेश राऊत, भिमराव पांडवे, राकेशभाई सेठजी, नितल सेठजी, सुषमा चौधरी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज खरेदी केले.

दिंडोरीतून अर्ज खरेदी करणारे

दिलीप गंगाधर पेलमहाले, राहुल शिवाजी ढोमसे, प्रशांत मनोहर वाघ, रमेश नामदेव ताजनपुरे, निलम मुरलीधर गवळी, महेश बाजीराव चव्हाण, बबन श्रीराम आवारे, दिपक विठ्ठल बर्डे यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले. यातील प्रशांत वाघ व रमेश ताजनपुरे यांनी नाशिक लोकसभेसाठी सादर करायचे अर्ज दिंडोरीतून खरेदी केल्यामुळे ते बाद ठरले आहेत. आरक्षणाच्या निकषातही ते बसत नाहीत व अर्जावर मतदारसंघाचा शिक्का असल्यामुळे त्यांना नव्याने अर्ज खरेदी करावे लागले.

Rally of Rajabhau waje & Bhaskar Bhagare
Dhule Lok Sabha Constituency : धुळ्यापुढे जळगावची रॅली फिकी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com