Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमधून गोडसे नाहीत अन भुजबळही नाहीत..! महायुतीकडून नव्या चेहऱ्याच्या चाचपणीला वेग

Political News : नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता वाढत आहे.
chhagan bhujbal and hemant godse
chhagan bhujbal and hemant godseesakal
Updated on

नाशिक : नाशिक लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात अस्वस्थता वाढत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे प्रचारदौरे धडाक्यात सुरू झाले आहेत. त्यात महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने अस्थैर्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून बोलले जात आहे. मात्र, ‘सकाळ’कडील विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार भुजबळ यांना होणारा विरोध पाहता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे. (Nashik Lok Sabha Election 2024 No Godse no Bhujbal from city Speed ​​up testing new faces from Mahayuti marathi news)

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर भाजपच्या विरोधामुळे आधीच पूर्णविराम दिला गेलेला आहे. त्यानंतर ओबीसी समाजाचे नेते आणि राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांचे नाव समोर आले. दिल्लीतून भुजबळांना निरोप मिळाल्याने त्यांनीही तयारी सुरू केली.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू असूनही भुजबळ यांच्या नावाची घोषणा झाली नाही. नाशिक लोकसभेत मतांचे जातीय धुव्रीकरण झाल्यास भुजबळ निवडून येऊ शकतात का, ही चाचपणी गेले काही दिवस सुरू होती. या संदर्भात समाधानकारक स्थिती नसल्याने भुजबळांऐवजी नव्या चेहऱ्याचा शोध महायुतीतील नेत्यांनी सुरू केलेला आहे.

महायुतीचा उमेदवार तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सामावून घेणारा असला पाहिजे, या दृष्टीने चाचपणी केली जात आहे. या चाचपणीत भाजप आणि संघ परिवाराने पुढाकार घेतला आहे. लोकसभा मतदारसंघातील आमदारांनीही नव्या चेहऱ्याला साथ द्यायला हवी, त्याच्या पाठीशी ते उभे राहायला हवेत, अशा उमेदवारासाठी प्रयत्न होत आहेत.

ग्रामीण भागातील लोकांना आकर्षित करू शकेल, त्याबरोबरच शहरातील मतदारांना आपला वाटेल, हे निकष उमेदवारासाठी ठेवण्यात आलेले आहेत. शिवाय, तरुण चेहरा असल्यास त्याला प्राधान्य दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.  (latest marathi news)

chhagan bhujbal and hemant godse
Loksabha Election 2024 : ‘महायुती’ आणि ‘मविआ’त तिढा कायम ; शिंदे गट नाशिकसाठी आक्रमक,ठाकरे गट-काँग्रेस उत्तर मुंबईसाठी आग्रही

बोरस्ते, ढिकले अन कोकाटे

या सगळ्या निकषांमध्ये बसणाऱ्या तीन नावांवर सध्या महायुतीत विचारमंथन सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार अॅड. राहुल ढिकले आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेची नाशिकची एकमेव जागा असल्याने बोरस्ते यांच्याकडे कल जास्त आहे.

बोरस्ते सगळ्यांना चालणारे नाव आहे; तर भाजपमधील तरुण नेते म्हणून ढिकले यांची ओळख आहे. अगदी ‘राष्ट्रवादी’तील नावाचा विचार करायचा झाल्यास सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगली टक्कर देऊ शकतात. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत नाशिकच्या अनुषंगाने राजकीय चक्र कसे फिरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

chhagan bhujbal and hemant godse
Loksabha Election 2024 : भाजपचे ‘घर चलो अभियान’ ; दहा हजार कार्यकर्त्यांचा अडीच लाख मतदारांशी संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.