Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

Lok Sabha Election 2024 : सूर्य मध्यावर येत आग ओकत असताना शहरातील काही मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडपांची उभारणी करण्यात आलेली नव्हती.
Women voters in trouble by heat
Women voters in trouble by heatesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी (ता.२०) कडक उन्हामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली असली तर, निवडणूक विभागाकडून मतदारासाठी पिण्यासाठी पाण्याची अन्‌ उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंडपाची सोय करण्यात आलेली नव्हती.

त्यामुळे मतदारांनी या गैरसोयीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी ज्येष्ठ नागरिक व रुग्ण असलेल्या मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध असल्याने मतदारांना दिलासा मिळाला. (Nashik Lok Sabha Election 2024 Strong resentment among voters no facilities)

नाशिक लोकसभा मतदार संघात सोमवारी मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र सध्या नाशिकमध्ये उष्णतेची लाट असून, पारा सातत्याने चाळीशी पार गेलेला आहे.

दुपारी सूर्य मध्यावर येत आग ओकत असताना शहरातील काही मतदान केंद्रावर उन्हापासून संरक्षण करण्यासाठी मंडपांची उभारणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अनेकांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी भिंतीच्या आडोशाचा आधार घ्यावा लागला. भद्रकाली हद्दीतील नॅशनल उर्दू हायस्कुल याठिकाणी असलेल्या काही मतदान केंद्राबाहेर अशी परिस्थिती होती.

त्याचप्रमाणे, मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना गर्दीमुळे किमान एक तासापेक्षा अधिकचा वेळ लागत होता. त्यात कडक ऊन्हामुळे घशाला कोरड पडत होती. परंतु शहरातील बहुतांशी मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. यामुळे अनेकांचा जीव पाण्यासाठी कासावीस होताना निदर्शनास आले. यामुळे अनेक मतदारांनी प्रशासनाविरोधात आगपाखड करीत तीव्र नाराजी व्यक्त केली. (latest marathi news)

Women voters in trouble by heat
Nashik Crime: संवेदनशिल विखे पाटील शाळेच्या केंद्रावर गोंधळ! पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात; माजी नगरसेविकेकडून दमदाटी

ज्येष्ठांचाही सहभाग

कडक ऊन, त्यात आजारपणामुळे अंथरुणावर असलेल्या मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावत, मतदानाच्या दिवशी मतदान न करता पर्यटनासाठी परगावी जाणाऱ्या मतदारांच्या डोळ्यात अंजण घालण्याचे काम केले. उर्दू नॅशनल हायस्कुल याठिकाणी ९२ वर्षीय सुफिया युसूफ शेख यांना वयोमानामुळे चालता येत नाही.

तरीही त्या मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आल्या. बी.डी. भालेकर शाळेतही एका ९० वर्षीय वयोवृद्‌ध मतदाराने आजारपण असतानाही मतदानाचा हक्क बजावला. अशा मतदारांसाठी मतदान केंद्रांवर व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली होती. त्यामुळे मतदारांना मोठा दिलासा मिळाला. 

Women voters in trouble by heat
Jalgaon Lok Sabha Election 2024: मध्यांतराच्या 4 तासांतील मतदान ठरणार निर्णायक! भर दुपारी उन्हाच्या तीव्रतेत 25 टक्क्यांची भर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.