Nashik Lok Sabha Election 2024: मतदान केंद्रावर मदतकेंद्र अन् पाळणाघर! 44 केंद्रांवर प्रसाधनगृह, 50 ठिकाणी रॅम्पची उभारणी

Nashik News : महापालिकेच्या वतीने मतदान व मतमोजणीची तयारी सुरू झाली असून, प्रत्येक मतदान केंद्रांवर मदतकेंद्र, पाळणाघरदेखील ठेवले जाणार आहे
polling station
polling stationesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 : महापालिकेच्या वतीने मतदान व मतमोजणीची तयारी सुरू झाली असून, प्रत्येक मतदान केंद्रांवर मदतकेंद्र, पाळणाघरदेखील ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर पाणी, प्रसाधनगृह, रॅम्प उभारले जाणार असून, सुविधा नसलेल्या ३६ केंद्रांवर पाणीपुरवठा, ४४ केंद्रांवर प्रसाधनगृह दुरुस्ती व ५० ठिकाणी रॅम्प तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Nashik Lok Sabha Election 2024 palnaghar at polling station news)

नाशिक लोकसभेत समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३५२, मध्य विधानसभा मतदारसंघात २९५, पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४१०, तर देवळाली विधानसभा मतदारसंघात ९० असे एक हजार १४७ मतदान केंद्रे आहेत.

या मतदान केंद्रांवर महापालिकेला सुविधा पुरविण्याची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने मतदान केंद्रांवरील सुविधांचा आढावा घेण्यात आला. पूर्व विधानसभा मतदारसंघात दहा मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ३० केंद्रांवर सध्या प्रसाधनगृहाचे सुरू असलेले काम तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

२४ मतदान केंद्रांवर नवीन रॅम्प बसविले जाणार आहेत. मध्य विधानसभा मतदारसंघात आठ केंद्रांवर पिण्याचे पाणी, १२ ठिकाणी प्रसाधनगृहे दुरुस्ती, १५ ठिकाणी रॅम्प उभारले जात आहे. पश्चिम विधानसभा मतदारसंघातील १६ मतदान केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दोन ठिकाणी प्रसाधनगृहांची दुरुस्ती केली जात आहे. (Latest Marathi News)

polling station
Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

सहा केंद्रांवर रॅम्प तयार केले जात आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात दोन केंद्रांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. पाच केंद्रांवर रॅम्प उभारले जात आहे. २५ केंद्रांवर वीजजोडणी नसल्याने तेथे उपलब्ध करण्याच्या सूचना विभागप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आल्या.

मतदान केंद्रांवर पाळणाघर, तसेच मदतकेंद्राची व्यवस्था केली जाणार आहे. २० मेस नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर मंडप उभारला जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी दिली.

polling station
Jalgaon Lok Sabha Election : शिरूरच्या मैदानात प्रचारासाठी उतरली ‘मुक्ताईची लेक’; ॲड. रोहिणी खडसेंचा शिक्रापूरला सभांचा धडाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.