गणूर : लोकसभा उमेदवारीबाबतच्या चर्चा निरर्थक असून, मी नाशिक लोकसभा निवडणूक लढविणार नाही, अशी स्पष्ट भूमिका डॉ. राहुल आहेर यांनी मांडली. चांदवड-देवळा मतदारसंघात राहिलेला विकासकामांचा अनुशेष भरून काढायचा आहे, या मतदारसंघाचा विकास करायचा आहे असे सांगत पुन्हा विधानसभा लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. यामुळे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची संभ्रमावस्था दूर झाली. (Nashik Lok Sabha Election 2024 rahul aher keda aher marathi news)
दुसरीकडे अनेक महिन्यांपासून चांदवड तालुक्यात सक्रिय झालेले केदा आहेरदेखील आमदारकीच्या महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. मात्र त्यांचे बंधू अर्थात, डॉ. राहुल आहेर यांनी पुन्हा विधानसभा लढविणार असल्याचे स्पष्ट संकेत देऊन संभ्रम दूर केला. परंतु मग नानांच्या चांदवडमधील अधिक सक्रिय होण्याचा अर्थ काय, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
डॉ. राहुल आहेरांनी मुत्सद्दीपणाने आमदारकीची लढाई दोनदा जिंकली, या दोन्ही निवडणुकांत त्यांचे बंधू केदा आहेरांचा वाटादेखील मोठा समजला जातो. डॉ. राहुल आहेरांनीही चांदवडमध्ये भाजपचे पारंपरिक मतदान जपत त्यात भर घातली आहे. यासाठी अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे. (Nashik Political News)
दोन पंचवार्षिकपासून केदा आहेरही आमदारकीच्या महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. त्याच अनुषंगाने ते चांदवड तालुक्यात अधिक सक्रिय झालेले दिसतात. तरुण कार्यकर्त्यांच्या मंडळांना विविध माध्यमातून बळ देत आहे. केदा आहेरांचे हे चांदवड तालुक्यात जास्त सक्रिय होण पुन्हा राहुल आहेरांच्या पाठी भक्कम उभ राहण्यासाठी आहे, की दबलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा प्रश्न कार्यकर्त्यात कायम आहे. यामुळे लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राहुल आहेरांनी एक संभ्रम दूर केला असला तरी नानांच्या अधिक सक्रिय होण्याचा अर्थ काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.