Nashik Lok Sabha Election 2024 Result : महायुतीची ‘पार्किंग’ही सुनीसुनी अन आघाडीचा रस्ता वाहनांनी जाम!

Lok Sabha Election 2024 Result : सकाळी महायुतीच्या पार्किंगमध्ये जादा वाहने होती तर, त्याविरूद्ध आघाडीच्या पार्किंगमधील स्थिती होती. परंतु दुपारनंतर, हे चित्रच उलटे पहावयास मिळाले.
People Celebrating Party Win
People Celebrating Party Winesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 Result : नाशिक, दिंडोरी लोकसभा निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये कोणताही वादावादीचा प्रसंग घडू नये यासाठी पोलिसांनी महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवार, समर्थकांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली होती.

याठिकाणी सकाळी महायुतीच्या पार्किंगमध्ये जादा वाहने होती तर, त्याविरूद्ध आघाडीच्या पार्किंगमधील स्थिती होती. परंतु दुपारनंतर, हे चित्रच उलटे पहावयास मिळाले. महायुतीच्या पार्किंग सुनीसुनी तर, महाविकास आघाडीच्या पार्किंग फुल्ल झालीच, रस्त्याही जाम झाला होता. (Nashik Lok Sabha Election 2024 Result Mahayuti vs Maha Vikas Aghadi)

अंबड वेअर हाऊस येथे मतमोजणी असल्याने समर्थकांची होणारी गर्दी व पार्किंग पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने विभागून दिली होती. यावेळी सकाळी मतमोजणी सुरु झाली, त्यावेळी महाविकास आघाडी, महायुती व अपक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी नेमलेल्या जागेवर पूर्णत: शुकशुकाट होता.

तर दुपारी दीड वाजता दिंडोरी व नाशिकच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी उसळली. हातात मशाल व तुतारीचे चिन्ह, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा ध्वज धरुन शहरासह जिल्ह्यातून कार्यकर्ते गटागटाने वेअर हाउसच्या दिशेने जमण्यास सुरुवात झाली.

दुपारी दोन वाजेपासून गुलाल उधळत मोठ्याने जल्लोष व घोषणाबाजी करीत विजयोत्सव साजरा करण्यात आला. मतमोजणी केंद्राबाहेर माजी आमदार वसंत गिते, माजी नगरसेवक विलास शिंदे, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत राजाभाऊ वाजे यांनी विजयोत्सव साजरा केला.

विशेष म्हणजे, तरुणाई महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यांनी घोषणाबाजी करतानाच फुगडीवर ठेका धरला. दुपारी साडेतीननंतर कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी वाढल्याने पोलिसांनी अधिकची कुमक तैनात केली. त्यावेळी प्रत्येक परिसरातून कार्यकर्ते येताच त्यांच्यावर गुलालांची उधळण सुरु राहिली. राजाभाऊ वाजे व भास्कर भगरे पोहोचताच कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीन वधारला. सायंकाळी सहापर्यंत तिथे कार्यकर्त्यांनी रस्ते पूर्णत: भरल्याचे दिसले. (latest marathi news)

People Celebrating Party Win
Dhule Lok Sabha Election 2024 Result: धुळे लोकसभेत निष्णात सर्जनची सर्जरी करून काॅंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव ठरल्या जायंट किलर!

शेतकऱ्याचा नाद खुळा

महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे यांचे पारडे जड होताच, बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमा होऊ लागली. यावेळी एका युवा शेतकऱ्याने पिकांवर फवारणी करण्याचे जंबो यंत्रच पाठीला बांधून त्यातून गुलालाची उधळण केली.

अशाही घोषणांचा दणदणाट

- ५० खोके, एकदम ओके...

- नाशिकचे राजे; राजाभाऊ वाजे...

- नाशिकचा नेता कैसा हो.. राजाभाऊ वाजे जैसा हो...

- रामकृष्ण हरि, तुतारी वाजली...

People Celebrating Party Win
Kalyan Loksabha Result : विजयाच्या गुलालाची उधळण करत डोंबिवलीत शिवसेनेचा जल्लोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.