Nashik Lok Sabha Election Result Memes : बाप.. बाप होता है...! सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Lok Sabha Election Result : सध्या लोकसभा निवडणुकीचे देशभर वारे वाहत असताना, त्याचे चांगले-वाईट पडसाद हे सोशल मीडियावर पडले असून, मजेशीर संदेश असणारे मिम्सचा अक्षरश: पाऊसच पडला आहे.
Raj Thackeray Meme
Raj Thackeray Memeesakal
Updated on

Nashik Lok Sabha Election 2024 Result : समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे प्रतिबिंब हे सोशल मीडियावर पडत असते. सध्या लोकसभा निवडणुकीचे देशभर वारे वाहत असताना, त्याचे चांगले-वाईट पडसाद हे सोशल मीडियावर पडले असून, मजेशीर संदेश असणारे मिम्सचा अक्षरश: पाऊसच पडला आहे. (Lok Sabha Election 2024 Result Memes)

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज झाली. यात काही धक्कादायक निकाल लागले आहेत. तर, काही ठिकाणी चुरशीच्या लढतीनंतर निकाल लागले. त्यावरून सोशल मीडियावर नेटकर्यांनी गंमतीशीर मिम्स व्हायरल केले. काही मिम्सची तर खूपच चर्चा होऊन मोठ्याप्रमाणात व्हायरलही झाले.

यात, राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयी नेटकऱ्यांनी ‘बाप... बाप होता है....’ अशा आशयाचा संदेश देत मिम्स व्हायरल केले असून, त्यास मोठ्या संख्येने पसंती मिळत गेल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे, कांद्याचे फोटो व्हायरल करीत काहींनी पराभूत उमेदवारांच्या डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. (latest marathi news)

Raj Thackeray Meme
Nashik Lok Sabha Election 2024 Result : महायुतीची ‘पार्किंग’ही सुनीसुनी अन आघाडीचा रस्ता वाहनांनी जाम!

एका नेटकऱ्याने तर, राज ठाकरे यांच्या छायाचित्राशेजारी ‘च्यायला, मी ज्या पंगतीला बसतो, नेमके माझ्यावेळीच जेवण कसे संपते....’ असा संदेशासह मिम्स व्हायरल केले आहे. तर, काही नेटकऱ्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावाने जरघोष करीत रिल्स सोशल मीडियावर व्हायरल केल्या आहेत. अशा एक ना अनेक मिम्स आणि रिल्सचा पाऊसच सोशल मीडियावर पडला होता.

Raj Thackeray Meme
Dhule Lok Sabha Election 2024 Result: धुळे लोकसभेत निष्णात सर्जनची सर्जरी करून काॅंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव ठरल्या जायंट किलर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.