Nashik Lok Sabha Election 2024 Result : मोदी नामवलय मतदारांच्या रोषापुढे निष्प्रभनाशिक; दिंडोरी, नंदुरबारला सभा घेऊनही निष्फळ

Lok Sabha Election : यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा जलवा वा लाट निष्प्रभ ठरली. जाहीर सभा, रॅली काढूनही मोंदीची जादू चालू शकली नाही.
Prime Minister Modi
Prime Minister Modiesakal
Updated on

Nashik News : दोन पंचवार्षिकमध्ये केवळ मोदी नावाच्या करिश्मावर भाजपने बहुमताने दिल्लीचे तख्त राखले. अगदी मोदी नाव लिहून ठाकलेले दगडसुद्धा लाटेत तरुण गेले. पण यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा जलवा वा लाट निष्प्रभ ठरली. जाहीर सभा, रॅली काढूनही मोंदीची जादू चालू शकली नाही. नरेंद्र मोदींनी सर्वाधिक २२ जाहीर सभा उत्तर प्रदेशात घेतल्या, त्यापाठोपाठ महाराष्ट्रात १८, कर्नाटकात ११, तेलंगणात ११, तमिळनाडूत सात, अशारीतीने मोदींनी ७५ दिवसांत १८० पेक्षा जास्त सभा, रॅली, रोड शोमधून निवडणुकांचा प्रचार केला. (Nashik Lok Sabha Election)

तर काही ठिकाणी विविध कार्यक्रमांतून जनतेला संबोधित केले. या सर्व सभा, रॅली व कार्यक्रमांची एकूण संख्या २०६ एवढी आहे. पण निवडणुकीच्या परिणामातून मोदी नावाला ओहोटी लागल्याचे समोर आले आहे. दोन पंचवार्षिकमध्ये भाजपचे सत्तासुंदरीचे स्वप्न करणाऱ्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्राने यंदा उन्हाच्या तडाख्यात तापलेले पाणी टाकून स्वप्न भंगच केले नाही, तर झोपेचेही खोबरे केले आहे.

महाराष्ट्रात झालेल्या १८ सभेच्या जागेवर भाजपला केवळ दोनच जागांचा फायदा झाला. १५ जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली. उत्तर महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप उमेदवार डॉ. भारती पवार, शिंदे गटाचे हेमंत गोडसे, नंदुरबार मतदारसंघात डॉ. हीना गावित यांच्यासाठी सभा घेतल्या. पण या जागेवर भाजपवर पराभवाची नामुष्की ओढवली. दुसरीकडे नगर जिल्ह्यातही सभेचा फायदा शून्य झाला.

मोदी यांच्या आवाहनाला नाकारून नगरकरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना कौल दिला. मोदी नावावर पुन्हा निवडून येऊ, ही महायुतीतील अनेक उमेदवारांची भाबडी आस मतदारांनी धुळीस मिळविली. पंतप्रधान मोदी यांनी महागाई, बेरोजगारी यांसारख्या गंभीर मुद्द्यांना बगल दिल्याचा परिणामही मतदानयंत्रातून समोर आला. हेच नाही, तर महायुतीच्या उमेदवारांकडे कोणताही प्रचाराचा अजेंडा नव्हता, ना काही विकासाचा. केवळ चारशे पार नारा अन्‌ मोदी पुन्हा एखादा पंतप्रधान व्हावे, या भोवतीच प्रचार गिरक्या मारत राहिला. (latest marathi news)

Prime Minister Modi
Nashik Lok Sabha Election 2024 Result : दिंडोरीच्या अगोदर नाशिकच्या उमेदवाराने उधळला गुलाल

उत्तर महाराष्ट्राने रडविले

नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ महायुतीचे बालेकिल्ला समजले जात. पण यंदाच्या निवडणुकीने हे बालेकिल्लाच उद्‌ध्वस्त केले. दिंडोरीत भाजपला कांद्याने अक्षरशः रडविले. मोदी यांनी सभा घेऊनही फायदा झाला नाही. उलट सभेत कांद्याच्या प्रश्‍नावर जय श्रीरामाची घोषणा शेतकऱ्यांचा रोष वाढविण्यास कारणीभूत ठरली.

पंतप्रधानांची ही सभा महाविकास आघाडीच्या फायद्याची ठरली. कांद्याचा प्रश्‍नाची धार आणखी तीव्र झाली अन्‌ याचे रूपांतर केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या पराभवात झाले. दुसरीकडे हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत असलेले हेमंत गोडसे यांनाही संसदेची दारं बंद झाली.

प्रियांका गांधींची जादू

नंदुरबार एकेकाळी कॉँग्रेसचा गड होता. पण मोदीलाटेत हा गड भाजपने काबीज केला. यंदा येथे डॉ. हीना गावित यांच्यासाठी मोदी यांची सभा झाली. मोदी यांच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी प्रियांका गांधी यांची सभा झाली. प्रियांका गांधी यांच्या सभेमुळे सारा माहोलच बदलून गेला. प्रियांका गांधीच्या सभेला उसळलेला जनसैलाब हा त्याची साक्ष होती. त्यांच्या सभेने एकाकी सर्व वातावरण फिरले अन्‌ ॲड. गोवाल पाडवी यांच्या रूपाने कॉँग्रेसने पुन्हा गडावर सत्ता स्थापित केली.

Prime Minister Modi
Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.