Nashik Lok Sabha Election 2024 Result : जायंट किलर ठरलेत राजाभाऊ अन् भास्कर भगरे; नाशिक, दिंडोरीत दणदणीत विजय

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे एक लाख ६६ हजार १२० एवढ्या दणदणीत मतांनी विजयी झाले.
Bhaskar Bhagare, Rajabhau Vaje
Bhaskar Bhagare, Rajabhau Vajeesakal
Updated on

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे एक लाख ६६ हजार १२० एवढ्या दणदणीत मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा पराभव करून वाजे ‘जायंट किलर’ ठरले आहेत. वाजे यांना सहा लाख १३ हजार ७०२ मते मिळाली. गोडसे यांना चार लाख ३२ हजार ४१८ मते मिळाली. (Nashik Lok Sabha Election 2024 Result)

गोडसे यांचे तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न भंग पावले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नाशिकचा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांनी एक लाख १३ हजार ३०५ मतांनी पराभव केला.

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी गेल्या २० मेस मतदान पार पडले. मंगळवारी (ता. ४) मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ ऊर्फ पराग वाजे यांनी टपाली मतदानापासूनच आघाडी घेतली.

त्यानंतर एक ते २० फेऱ्यांपर्यंत वाजे यांनी आघाडी कायम ठेवली. पहिल्या फेरीत वाजे यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्यापेक्षा दहा हजार ७५२ मतांनी आघाडी घेतली. ती आघाडी साधारण आठ ते नऊ हजार मतांनी कायम ठेवली. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वाजे यांची उमेदवारी जवळपास दीड महिना अगोदर जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढता आले. (latest marathi news)

Bhaskar Bhagare, Rajabhau Vaje
Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या 29, दिंडोरीच्या 8 उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त!

त्याचा परिणाम म्हणून मतदानाच्या आकडेवारीत वाढ झाल्याचे वाचून येत आहे. श्री. गोडसे यांना प्रचारासाठी अवघे सोळा दिवस मिळाले असले, तरी यापूर्वी ते दोनदा निवडून आल्याने मतदारांपर्यंत पोचले होते. त्यामुळेच गोडसे यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाली, तरी गोडसे यांना अपेक्षित मते घेता आली नाहीत.

वाजे यांना महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची मिळालेली साथ व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण भागातील नेटवर्क या आधारे मतदारांपर्यंत पोहोचता आले व प्रचारात आधीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवण्यात यश मिळाल्याचे मतदानातून स्पष्ट झाले.

प्रथमपासून घेतलेली आघाडी राहिली कायम

गेल्या साडेचार वर्षांत राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींचा परिणाम म्हणूनही या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. दुसऱ्या फेरीला १९ हजार ५४३, तर तिसऱ्या फेरीला ३० हजार ५९९ मतांची आघाडी मिळाली. चौथ्या फेरीला ३६ हजार ४३८, पाचव्या फेरीला ४४ हजार ५१२, तर सहाव्या फेरीला ५१ हजार मतांची आघाडी मिळाली.

Bhaskar Bhagare, Rajabhau Vaje
Nashik Lok Sabha Election 2024 Result : भगरे यांच्या विजयाने ‘राष्ट्रवादी’चा वनवास संपला! पहिल्या निवडणुकीत भगरे दिल्लीत

त्यानंतर ६२ हजार ७१८ व आठव्या फेरीला तब्बल ७१ हजार ३६० मते मिळाली. नवव्या फेरीला ८१ हजार २७४ मते मिळाली. दहाव्या फेरीला एक लाख तीन हजार ३९१ मते मिळाल्यानंतर वाजे यांची आघाडी गोडसे यांना तोडणे कठीण झाले. शेवटपर्यंत आघाडी कायम राहिली. अठराव्या फेरीला एक लाख ४५ हजार ७२ मतांची वाजे यांनी आघाडी घेतली. विजय दृष्टिपथात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर जल्लोष केला.

बाबाजी फॅक्टर निष्प्रभ...

महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराव्यतिरिक्त संत जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या एंट्रीमुळे चुरस निर्माण झाली होती. प्रचारादरम्यान शांतिगिरी महाराज यांनी निवडून आल्यावर भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. भाजपला शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेवर भूमिका स्पष्ट करावी लागली होती. शांतिगिरी महाराज काहीतरी चमत्कार करतील, असे सुरवातीपासून वाटत होते.

मात्र त्यांना अवघे ४४ हजार ३०० मते मिळाल्याने बाबाची फॅक्टर नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये अप्रभावी ठरल्याचे स्पष्ट झाले. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला डोकेदुखी ठरू शकते, असे बोलले जात होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे हक्काचे मतदानही पडले नाही. मात्र शांतिगिरी महाराजांपेक्षा अधिक मते वंचित आघाडीचे करण गायकर यांना मिळाली. गायकर यांना ४७ हजार मतदान झाले.

Bhaskar Bhagare, Rajabhau Vaje
Nashik Lok Sabha Election 2024 Result : दिंडोरीच्या अगोदर नाशिकच्या उमेदवाराने उधळला गुलाल

भगरेंकडून दिंडोरी ‘सर’

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे विजयी झाले. त्यांनी विद्यमान खासदार व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा एक लाख १३ हजार ३०५ मतांनी पराभव केला. दिंडोरीत पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम होती.

दिंडोरीत ‘डमी’ अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांनी जोरदार मुसंडी मारत एक लाख मते घेऊन भगरे यांना घाम फोडला. विशेष म्हणजे शिक्षक नसताना या भगरेंच्या नावापुढे उमेदवार यादीत कंसात ‘सर’ असा उल्लेख आलेला होता. तो कसा आला हा वेगळा मुद्दा, मात्र या ‘सर’ने भगरे सराची आघाडी मात्र कमी झाली हे निश्चित!

Bhaskar Bhagare, Rajabhau Vaje
Nashik Lok Sabha Election 2024 Result : राजाभाऊ वाजेंची विजयी मिरवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.