Nashik Lok Sabha Election : कळवणला 2300 मतदार घरूनच करणार मतदान

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ मतदारांना घरूनच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
Voter registration officer while filling the application form of senior citizen Shankarrao Deshmukh.
Voter registration officer while filling the application form of senior citizen Shankarrao Deshmukh.esakal
Updated on

Nashik Lok Sabha Election : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षांपुढील ज्येष्ठ मतदारांना घरूनच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात कळवण तालुक्यात वयाची ८५ पार केलेले २ हजार ३१६ मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन कामाला लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना घरी राहून मतदानाचा हक्क बजावता येण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.(Nashik Lok Sabha Election 2300 voters will vote from home)

कळवण-सुरगाणा मतदारसंघात कळवण तालुक्यात ८५ वयांच्या पुढील २ हजार ३१६ मतदार असून, १०० पेक्षा जास्त वय असलेले ४ मतदार, तर १८३९ दिव्यांग मतदार आहेत. दरम्यान, ‌मतदान नोंदणी अधिकारी गेल्या चार दिवसांपासून ८५ व त्या पुढील वयोवृद्ध मतदारांची भेट घेऊन त्यांना घरी राहून मतदान करायचे आहे अथवा मतदान केंद्रावर करायचे, याबाबत अर्ज भरून घेत आहेत.

दिव्यांगांसाठी ४० टक्क्यांची अट

वयोवृद्ध मतदारांचे घरी मतदान घेतेवेळी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकणार आहेत. या प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडिओचित्रीकरण करण्यात येणार आहे. (latest marathi news)

Voter registration officer while filling the application form of senior citizen Shankarrao Deshmukh.
Nashik Lok Sabha Code of Conduct: आचारसंहितेमुळे शहरावर पाणी संकट! पाण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव आयोगाच्या कोर्टात

वयोवृद्ध मतदारांबरोबरच दिव्यांगही घरी राहून मतदान करू शकणार आहेत. यासाठी दिव्यांग ४० टक्के अपंग असावा, ही अट आहे.

"निवडणूक आयोगाने यावेळी ८५ पार व ४० टक्के दिव्यांगासाठी घरी राहूनच मतदान करून घेण्याची सुविधा केली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढेल व आपली लोकशाही मजबूत होईल."- रोहिद‌ास वारूळे‌, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कळवण

Voter registration officer while filling the application form of senior citizen Shankarrao Deshmukh.
Nashik Success Story : कळवणचा अनिल दळवी सहाय्यक गटविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.