Nashik Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी 29 सूक्ष्म निरीक्षक नियुक्त! प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांची माहिती

Nashik News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येवला मतदारसंघात २९ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे
Provincial Officer Babasaheb Gardhove while imparting training to Sub Inspectors.
Provincial Officer Babasaheb Gardhove while imparting training to Sub Inspectors.esakal
Updated on

येवला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येवला मतदारसंघात २९ सूक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. निवडणुकांच्या सर्व घटनांवर सूक्ष्म निरीक्षक लक्ष ठेवणार असल्याची माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकिसाठी विधानसभा मतदारसंघात सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, या निरीक्षकांना तहसील कार्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी गाढवे यांनी विविध सूचना दिल्या. (Nashik Lok Sabha Election 29 micro inspectors appointed news)

यावेळी प्रशिक्षणासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, नायब तहसीलदार नितीन बहिकर, पंकज मगर उपस्थित होते. मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रियेसंबंधी पार पाडायची कर्तव्य-जबाबदारी याबाबत सर्व निवडणूक कर्तव्यावर नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हस्तपुस्तिकेतील परिशिष्ट २८ मधील नमूद सर्व १८ मुद्द्यांची सखोल माहिती देऊन सदर मुद्देनिहाय वस्तुनिष्ठ अहवाल थेट निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर कसा करावा, याबाबत माहिती देण्यात आली.

भारत निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे दिवसभरात घडणाऱ्या सर्व निवडणूक प्रक्रियाशी संबंधित घटनांचे बारकाईने सूक्ष्म निरीक्षण करून निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे का अगर कसे याबाबत अहवाल निवडणूक निरीक्षकांना सादर करण्याबाबत प्रशिक्षणात सुचित करण्यात आले.

Provincial Officer Babasaheb Gardhove while imparting training to Sub Inspectors.
Satara Lok Sabha : 'मला काहीही लपवायचं नाही, मी लोकसभा निवडणुकीला उभा राहणारच'; उदयनराजेंनी केलं स्पष्ट

मतदानाच्या दिवशी मॉक पोल, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतदार प्रतिनिधी, मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर न करणे, दिव्यांग मतदार, महिला मतदार व जेष्ठ नागरिक याबाबत मतदान केंद्रावर व्यवस्था या गोष्टींचे निरीक्षण करून वस्तुनिष्ठ माहिती सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले.

दांडीबहाद्दरांना कारणे दाखवा नोटीस

प्रशिक्षणासाठी गैरहजर सूक्ष्म निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. सूक्ष्म निरीक्षक हे निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वतंत्र नि:पक्षपातीपणे काम करणारी यंत्रणा असल्याचे बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले. यावेळी निरीक्षकांनी विविध शंका विचारून त्याचे निरस्सन करून घेतले.

Provincial Officer Babasaheb Gardhove while imparting training to Sub Inspectors.
Satara Lok Sabha : साताऱ्यासाठी सिल्वर ओकवर खलबते; उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम, श्रीनिवास पाटलांचा पुन्हा लढण्यास नकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()