Nashik Lok Sabha Election : 44 भरारी पथके, 16 नाक्यांवर तपासणी

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून ४४ भरारी पथके, ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके १६ आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यांसह सज्ज आहेत.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency esakal
Updated on

Nashik News : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मिळून ४४ भरारी पथके, ८२ स्थायी पथके, २४ चलचित्र सर्वेक्षण पथके, १२ चलचित्र निरीक्षण पथके १६ आंतरजिल्हा, आंतरराज्य तपासणी नाक्यांसह सज्ज आहेत. भरारी व स्थायी पथकांमध्ये केंद्रीय पोलिस दलाचे सदस्य समाविष्ट केले आहेत. (Nashik Lok Sabha Election 44 Bharari teams and 16 checkpoints)

लोकसभा निवडणुकीची वैशिष्ट्ये ः

- मतदान कर्मचारी : एकूण ११० टक्के प्रमाणात १७ हजार २८ कर्मचारी केंद्रावर नियुक्त केले जाणार आहेत. ज्यात एकूण पाच हजार ८२ महिला कर्मचारी आहेत.

- वेबकास्टिंग : नाशिक लोकसभा मतदारसंघात ९५५ केंद्रांवर, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ९६१ केंद्रांवर वेबकास्टिंगची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.

- सूक्ष्म निरीक्षक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी १३०, तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी २४० सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक त्यांचा अहवाल मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडे सादर करतील.

- दिव्यांग मतदार : नाशिक जिल्ह्यात दोन हजार ३१७ ठिकाणी व्हीलचेअरची सोय करण्यात येईल. ६२२ मतदारांना वाहतूक सुविधा पुरविण्याची पूर्वतयारी करण्यात आली आहे.

- मतदार ओळख चिठ्ठीवाटप : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ९५.४० टक्के, तर नाशिक लोकसभा मतदारसंघात ९४.६० टक्के मतदार ओळख चिठ्ठी बीएलओंमार्फत वाटप करण्यात आलेल्या आहेत. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Voter List : मतदार यादीत असे शोधा नाव!

- पोर्टलवर दोन हजार ६१९ तक्रारी : तक्रार सेवा पोर्टल अहवाल प्राप्त झाला असून, पोर्टलवर दोन हजार ६१९ विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील ३६४ केसेसचे निराकरण झाले; तर दोन हजार २५१ केसेस क्लोज करण्यात आल्या आहेत. नाशिक पश्चिम भागात सर्वाधिक ६०५ तक्रारी आजअखेर प्राप्त झाल्या.

- हेल्पलाइनवर २८८ तक्रारी : १९५० या डायल नंबरची मतदान हेल्पलाइन सेवाही कार्यन्वित होती. १६ मेअखेर २८८ विविध तक्रारी त्यावर प्राप्त झाल्या. यातील सर्वच तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

मतदान कार्ड नसेल तर ‘हा’ पुरावा दाखवा

- बँक, टपाल कार्यालयाने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक

- कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

- वाहनचालक परवाना, पॅनकार्ड

- रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड

- भारतीय पासपोर्ट

- फोटोसह पेन्शन दस्तावेज

- केंद्र व राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र

- खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : भगूरमध्ये प्रचाररॅली काढत वाजेंकडून प्रचाराची सांगता

मतदान यंत्रांसह कर्मचाऱ्यांसाठी ४८७ बस

लोकसभा निवडणुकीसाठी महामंडळाच्या ४८७ बस निवडणुकीच्या कामासाठी निश्चित करण्यात आल्या असून, त्याचे आगारानिहाय वाटपही ठरविण्यात आले. निवडणुकीत दोन हजार वाहनांची गरज आहे. यापैकी सुमारे एक हजार वाहने सरकारी मालकीची, तर एक हजार खासगी वाहने भाड्याने घेतली जातील. शासकीय वाहने प्रथमपासूनच अधिग्रहीत करण्यात आलेली असून, आता केवळ बस आणि ट्रक यांचेच अधिग्रहण बाकी आहे. त्यात ३० ट्रक, तर ४८७ बसचे नियोजन आहे.

बसचे नियोजन...

मालेगाव मध्य- २१

मालेगाव बाह्य- ३९

बागलाण- ३१

नांदगाव- ३९

कळवण-सुरगाणा- ४१

चांदवड- ४२

येवला- ४०

निफाड- ३७

दिंडोरी-पेठ- ३७

सिन्नर- ४४

नाशिक मध्य- २०

नाशिक पश्चिम- २२

देवळाली- २३

नाशिक पूर्व- २९

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वर- २७

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात मोबाईलसह कोणतीही वस्तू नेण्यास मज्जाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.